भारत सरकारने जनतेपासून लपवून ठेवलेली जेट विमान पडल्याची बातमी आता चिफ डिफेन्स स्टॉफ (सीडीएस) अनिल चव्हाण यांनी उघड केली आहे. विमान राफेल पडले का तेजस की जग्वार की सुखोई हे मात्र सीडीएस यांनी सांगितले नाही. का शासनाने असे केले असेल. खा.राहुल गांधी यांनी प्रश्न विचारला तर त्यांना पाकिस्तानचे ते प्रश्न ते विचारतात असे उत्तर देण्यात आले. पण आता सीडीएसने चुकीचे सांगितले असे नेते म्हणणार आहेत काय? सीडीएसने सांगितल्याप्रमाणे विमान पडले हे जास्त महत्वाचे नसून विमान का पडले हे महत्वाचे आहे. याचा ईतिहास तर 1999 पासून सुरू होतो मग. सेवानिवृत्त विंग कमांडर अनुवा आचार्य यांनी सांगितले की, मोदी सरकारने भारताला वायुसेनेच्या दृष्टीकोणातून 20 वर्ष मागे टाकले आहे. कोण फेडणार हे पाप हा प्रश्न सुध्दा या निमित्ताने समोर आला आहे.

चिफ ऑफ डिफेन्स स्टॉफ जनरल अनिल चव्हाण यांनी ब्लुम्बर या विदेशी मॅग्झीनला सिंगापुरमध्ये दिलेल्या मुलाखतीत पत्रकार हसलिंदा अमिन यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देतांन हे सांगितले की, विमान पडणे महत्वाचे नाही. तर ते का पडले हे महत्वाचे आहे. त्यानुसार आम्ही त्याचा शोध घेतला आणि त्या दुरूस्त्या करून पुन्हा हल्ला केला आणि टार्गेट पुर्ण केले. त्या दोन दिवसात काय झाले. तर सीडीएसच्या बोलण्याप्रमाणे ते चुकांना समजून घेत होते आणि त्यात सुधारणा करून घेत होते. या काही प्रश्नांची उत्तरे वायुसेनेचा पुर्ण अभ्यास असणारेच पत्रकार देवू शकतात. परंतू सीडीएसची मुलाखत आल्यानंतर मात्र त्यावर प्रश्न विचारण्याचा हक्क भारतातील प्रत्येक नागरीकाचा आहेच. हसलींदा अमिन यांनी विचारले की, पाकिस्तान सांगते आम्ही सहा विमाने पाडली. याला अनिल चव्हाण यांनी चुकीचे असल्याचे उत्तर दिले. अमिनच्या दुसऱ्या प्रश्नावर मात्र अनिल चव्हाण यांनी जेट पडल्याचे मान्य केले आता ते जेट कोणते आहे. राफेल, सुखोई, जग्वार की, तेजस याचे ही उत्तर अनिल चव्हाण यांनी दिले नाही. ते पुन्हा-पुन्हा सांगत होते की, विमानात झालेल्या तांत्रिक बाबीमुळे विमान पडले. त्यात आम्ही दुरूस्त्या केल्या आणि ठरवलेले सर्व टार्गेट उडवले. भारताचे जेट पडल्याच्या बातम्या विदेशातून येत होत्या. तेंव्हा तृणमुल कॉंगे्रसच्या खासदार तथा पुर्व पत्रकार सागरीका घोष यांनी सुध्दा हा मुद्दा उपस्थित केला होता की, विदेशी मिडीया सांगते आहे त्यापेक्षा सरकारने विशेष संसद बोलावून आपली बाजू देशासमोर मांडावी. ब्लुम्बरसह सीडीएस अनिल चव्हाण यांनी रायटरला सुध्दा मुलाखत दिली आणि सांगितले दहा तारखेला आम्ही पुर्ण तयारीने उतरलो. पण भारतीय वायु सेनेने दोन दिवस उडाण का केले नाही. याचे उत्तर मात्र अनिल चव्हाण यांनी टाळले. द हिंदु च्या पत्रकार सुहासिनी हैदर यांनी एक्सवर लिहिले होते की, भारताचे जेट पडले. त्यावर केंद्र सरकारच्या ट्रोल धारकांनी एवढी ट्रोल केेले की, त्यांना ते पोस्ट परत घ्यावी लागली. तसेच विजेतासिंह या पत्रकार महिलेला सुध्दा एवढे ट्रोल केले की, द हिंदुने असे लिहिले की, भारत सरकारने अधिकृत माहिती दिली नाही म्हणून आम्ही आमची पोस्ट डिलिट करत आहोत. याचा अर्थ द हिंदुने माफीच मागितली. बघा वाचकांनो पत्रकार होणे किती अवघड आहे. आता सीडीएसने मान्य केले आहे की, विमान पडले मग आता द हिंदु काय करणार आपण पोस्ट केलेल्या डिलिटवर पुन्हा माफी मागणार.

सीडीएसने विमान पडल्याच्या संख्येला दुजोरा दिला नाही. पण सुब्रम्हण्यम स्वामी सांगतात भारताचे पाच विमान पडले. राफेलमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे सांगतात. दोन दिवसांपुर्वी वायुसेना प्र्रमुख सरदार हरजितसिंघ यांनी रक्षामंत्री राजनाथसिंह यांच्यासमोर एका कार्यक्रमात सांगितले की, ज्या योजनांना आम्हाला पुर्ण करता येत नाही त्याला आम्ही का महत्व देतो आणि जगभर महत्व सांगतो. खरे तर भारत-पाकिस्तानच्या युध्दात पाकिस्तानच्या मागे चिन आहे. याची जाणिव ठेवणे खुप महत्वाचे आहे. आता भारताचे विमान पडले. ते चिनच्या हत्यारामुळे की, पाकिस्तानच्या याचाही शोध लागत नाही. का सरकार खोटे बोलत होती, का सैन्याला खोटे बोलायला लावले. अगोदर सांगितले की, जेट पडलेच नाही, त्यानंतर सांगितले की, आमचे सर्व पायलट परत आले आणि आता जेट पडल्याचीपण माहिती आली आहे. पायलट आले आणि जेट पडले म्हणजे पायलटने ईजेक्शन केले. परंतू सुदैवाने त्यांचे ईजेक्शन सुध्दा भारताच्या वायुसिमेत झाले आणि जेट सुध्दा भारताच्या सिमेत पडले. आजच्या परिस्थितीत भारताचे पंतप्रधान ऑपरेश सिंदुरचे नाव घेवून राजकीय खेळी करत आहेत. मग जेट पडल्याची जबाबदारी कोण घेणार. की ती सुध्दा सैन्याच्या माथी मारली जाणार. सीडीएस हे भारतीय थलसेना, वायुसेना आणि नौसेनेचे प्रमुख असतात. मग त्यांच्या बोलण्यावर विश्र्वास करायचा नाही काय? वायुसेना प्रमुख हरजितसिंघ म्हणाले होते की, एएमसीए या योजनेच्या माध्यमातून 2035 पर्यंत फायटर जेट मिळतील. माझ्या जीवनात मी एकही योजना पुर्ण झालेली पाहिलेली नाही.

भारतीय वायुसेनेत महिलांना प्रवेश मिळाल्यानंतर पहिल्या बॅचमधील विंग कमांडर अनुवा आचार्य आता सेवानिवृत्त झाल्या आहेत. पण त्या सांगतात. जेट पडल्याच्या बातमीला सरकारने खोटा प्रोपोगंडा सांगितला. मग 11 वर्ष सरकार काय करत होती. अनुवा आचार्य सांगतात 1999 च्या कारगिल युध्दानंतर एक समिक्षा समितीची स्थापना पंतप्रधान अटलबिहारीजी वाजपेयी यांनी केली होती आणि त्यानंतर राफेल सौदा सुरू झाला होता. 1999 चे राफेल 2023 मध्ये आले. 1500-2000 कोटीचे विमान आहेत. आता फिफ्थ जनरेशन विमान तयार आहेत. राफेल त्यापेक्षा मागेच आहे आणि आज आमची सरकार राफेल आल्यानंतर त्याचे महिमा मंडन करतांना दिसत होती. आज चिनकडे जे-15 हे विमान तयार आहे. युध्द कधीही होते तर ते समोर सैन्यात होत असेत. परंतू युध्दा संपुर्ण देश लढत असतो. अनुवा आचार्य सांगतात 70 च्या दशकात त्यावेळी सर्वात अत्याधुनिक असलेले 800 पेक्षा जास्त मिग-21 हे विमान भारताने खरेदी केले होते. 1983-84 मध्ये मिराज आले. प्रत्येक सरकारने असेच केले आहे. 3000 विमानापैंकी 1200 जेट आमच्याकडे होते, 800 वाहतुकीची विमाने होती आणि उर्वरीत हेलिकॉप्टर होते. सन 2007-2008 मध्ये 250 सुखोई आले होते आणि तेंव्हा आम्ही जगातील चौथ्या क्रमांकाची वायुसेना झालो होतो असे अनुवा आचार्य सांगतात.

आज भारतासमोर असलेल्या परिस्थितीबद्दल विवेचन करतांना अनुवा आचार्य सांगतात की, 2007 पासूनच भारतात एरो इंडिया शो होत आहेत. त्यातून उत्कृष्ट विमान निवडूण त्याची जागतिक दर्जावर निविदा काढण्यात यावी आणि उत्कृष्ट विमान खरेदी करण्यात यावे. पण भारत सरकारने पाच पट जास्त किंमत देवून राफेल खरेदी केले आणि त्यानंतर निविदाच काढली नाही. आज आमच्याकडे राफेल आल्यानंतर फक्त सव्वा दोन स्कॉडन वाढले आहेत. खरे तर आम्हाला बारा स्कॉडनची गरज आहे. राफेलमध्ये तांत्रिक हस्तांतरण झाले नाही तो सर्वात मोठा दुर्देवी प्रकार आहे. नरेंद्र मोदी सरकारने सन्याला मार्केटींग बनविल्याचा आरोप अनुवा आचार्य यांचा आहे. सन 2000 मध्ये भारताला 120 जेटची गरज होती. तेजस-84 तयार होणार होते. ते पण झाले नाही. कारण सैन्याच्या कारभारात खाजगीकरण करण्याचा धंदा सुरू झाला आहे. अनुवा आचार्य म्हणतात आजही जागतीक निविदा काढायला हवी जी दहा वर्षापासून काढायला हवी होती. तर दोन वर्षात चार-चार विमाने येतील आणि आम्ही अद्यावत होवू. एका देशाकडे न जाता जागतीक मार्केटमध्ये उतरा जेणे करून आम्हाला स्पर्धेचा फायदा होईल. सरकार ते सरकारमध्ये करार केला असे सांगून जे आज भुलवले जात आहे. खरे पाहिले तर आजच्या विदेश नितीप्रमाणे आमचा कोणी मित्रच नाही. नरेंद्र मोदीने सैन्याला नेहमीच दुर्बल केले, त्यांना साधने दिली नाही.मनुष्यबळ सुध्दा कमी केले. फक्त बढाया मारण्याचत ते पुढे राहतात. चुनूक हेलिकॉप्टर आल्यावर आम्ही आणले असा डांगोरा पेटला. अहो त्यासाठी युपीए सरकारने सर्व करार केले होते. एनडीए सरकारच्या काळात फक्त डिलेव्हरी आली. आजच्या परिस्थितीत सेन्य, सैन्याची गरज हे सर्व खाजगीकरणाकडे जात आहे असे दिसते.1999 पासून जेट विमानाचे कावेरी इंजन तयार होत आहे ते आजही झालेले नाही. वाचकांनीच याचा विचार करावा.

