नांदेड(प्रतिनिधी)-शेवडी बाजारीराव येथील एका शेतकऱ्यांने आपल्या स्वत:च्या हाताने आपल्या शेताच्या झालेल्या दुर्देवी अवस्थेचा व्हिडीओ तयार केला आहे आणि या परिस्थितीत शेतकरी आत्महत्या नाही तर काय करेल. मागील दहा दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे आणि या पावसामुळे अनेक पिकांचे नुकसान झाले आहे. या संदर्भात बोलतांना शेतकरी सांगत आहे की, काय करावे शेती सोडून द्यावी की, आत्महत्या करावी, माझा प्रश्न सरकारला आहे.
आपल्या सात एकर शेतात पिकांच्या झालेल्या नासाडीला दाखवत. या संदर्भाने ते प्रश्न विचारत आहेत की, शेवडीच्या तलाठ्याला, कृषी अधिकाऱ्याला याची जाण आहे काय? शेतकरी त्रासात आहे. आता हे सडलेले पिक घेवून आम्ही तहसीलला जावे काय? उद्योगाचे कर्ज फेडतांना वेगवेगळ्याा पध्दतीने त्याची परतफेड होवू शकते. परंतू शेतकऱ्यांच्या शेतातील पिकच नासले तर शेतकरी कसा कर्ज फेडेल. आम्ही जीव द्यावा काय ? जय जवान जय किसान हा नारा देत हा शेतकरी आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही असे व्हिडीओमध्ये सांगत आहे. सरकारला माझा प्रश्न असल्याचे वाक्य उच्चारून जय हिंद, जय जवान जय किसान असे तिन शब्द शेवटी हे शेतकरी वापरत आहेत.
शासन आम्ही शेतकऱ्यांसाठी असे केले, शेतकऱ्यांसाठी ही योजना आणली. शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले असे म्हणून प्रसार माध्यमांच्यावतीने वाहवाही मिळविण्याचा प्रयत्न करते. पण प्रत्यक्षात शेतकऱ्याची अवस्था काय झाली. ज्या शेतकऱ्याकडे सात एकरच शेत जमीन आहे. त्याने आत्महत्या केली तर त्याच्या कुटूंबाचे कोण पाहिल, त्याच्या लेकरांचे शिक्षण कसे होईल असे अनेक प्रश्न आहेत. निसर्गाचा कोप झाला खरा. पण अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना सरकार मदतीचा हात देणार नाही तर ते सरकार काय कामाचे असा मुद्दा सुध्दा या व्हिडीमुळे समोर येत आहे.
संबंधीत व्हिडीओ…
