नांदेड(प्रतिनिधी)-बारड येथील देशमुख कुटूंबात शेतीच्या वादातून झालेल्या भांडणात दोन सख्या भावाने मिळून आपल्या तिसऱ्या भावाचा खून केला आहे. पोलीसांनी अत्यंत त्वरीतगतीने या प्रकरणात हालचाल केली आणि तिन मारेकऱ्यांना न्यायालयाने 22 मे पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
मयुरी राजू देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 16 मे रोजी दुपारी 12.30 वाजेच्यासुमारास मौजे बारड येथील त्यांच्या शेतात त्यांचे पती राजू जानकीराम देशमुख (40) हे गेल्यानंतर त्या शेताच्या संदर्भाने आपसात सुरू असलेल्या वादामुळे राजूचे बंधू सुर्यकांत जानकीराम देशमुख, चंद्रकांत जानकीराम देशमुख, चंद्रकांतच्या पत्नी शिल्पा देशमुख आणि उमेश सुर्यकांत देशमुख या चार जणांनी माझे पती राजू देशमुख यांना शेतातून बाहेर निघ असे म्हणून वाद घातला आणि या वादात त्यांच्या डोक्यात दगड मारून त्यांचा खून केला आहे. बारड पोलीसांनी याप्रकरीण गुन्हा क्रमांक 61/2025 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक संतोष केदासे यांच्याकडे देण्यात आला. आज दि.18 मे रोजी न्यायालयाने बारड पोलीसांनी हजर केलेल्या सुर्यकांत देशमुख, चंद्रकांत देशमुख आणि उमेश देशमुख या तिघांना 22 मेपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
बारडमध्ये देशमुख कुटूंबातील वादातून सख्या भावांनी सख्या भावाचा खून केला
