नांदेड : नायगाव तालुक्यातील गोदमगाव येथे उभारण्यात आलेल्या भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा इंजि. आनंदराज आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या 18 मे रोजी रविवारी सायं. 05:00 वा. संपन्न होणार आहे. जागतिक नॉलेज ऑफ सिम्बॉल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महामानव डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा गोदमगाव येथे व्हावा म्हणून तेथील आंबेडकर प्रेमी जनता अनेक वर्षांपासून संघर्षरत होती. अखेर पुतळा उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. आगामी असंख्य पिढ्याने सामाजिक समतेची , न्यायाची , बंधुत्वाची प्रेरणा देणाऱ्या या पूर्णाकृती पुतळा व सार्वजनिक वाचनालयाचा लोकार्पण सोहळ्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू इंजि. आनंदराज आंबेडकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. लोकार्पण सोहळ्यास आंबेडकर प्रेमी जनतेने उपस्थित राहण्याचे आवाहन रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. राजू सोनसळे, माधवदादा जमदाडे, अनिल सिरसे, प्रतिक मोरे, राहुल चिखलीकर यांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,662 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation दमदार स्थानिक गुन्हे शाखेच्या उपस्थितीत सुध्दा अवैध धंदे सुरूच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घोषणेनंतर दिड महिन्यातच नांदेड आणि संभाजीनगरसाठी दोन ‘सीट्रिपलआयटी’ना मंजूरी