नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरातील वजिराबाद पोलीस ठाण्यात अनेक दिवसांपासून बेवारस असलेल्या 168 आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील 25 दुचाकी वाहनांची ओळख पटविण्यासाठी पोलीसांनी आवाहन केले आहे.
पोलीसंानी जनतेला केलेल्या आवाहनाप्रमाणे नांदेड शहरातील वजिराबाद पोलीस ठाण्याच्या प्रांगणात 168 दुचाकी वाहने उभी आहेत. तसेच शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या प्रांगणामध्ये 25 दुचाकी वाहने उभी आहेत. या वाहनांच्या मालकांचा शोध लागला नाही. या सर्व 193 वाहनांची यादी नांदेड जिल्हा पोलीस दलाचे संकेतस्थळ www.nandedpolice.gov.in, नांदेड जिल्हा पोलीस फेसबुक पेज Nanded Police, इंस्टाग्राम sp_nanded_police आणि ट्विटरवर उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या बेवारस वाहनांच्या संदर्भाने नागरीकांनी पुढच्या दोन दिवसात आपल्या वाहनाच्या मालकी हक्काची ओळख पटवून ती वाहने घेवून जावीत अन्यथा या वाहनांचा कोणीच मालक नाही, वाहने बेवारस आहेत असे गृहीत ठेवून कायदेशीर प्रक्रिया पार पाडून ती वाहने लिहावाद्वारे विक्री केली जातील. वाहनांच्या माहितीबाबत काही अडचणी आल्यास जनतेने शिवाजीनगर येथील दुरध्वनीक्रमंाक 02462-256520 आणि वजिराबाद पोलीस ठाण्यातील दुरवध्नी क्रमांक 02462-236500 यावर संपर्क साधण्याचे आवाहन नांदेड पोलीस दलाने केले आहे.

