नांदेड,(प्रतिनिधी)- राज्य शासनाच्या गृह विभागाने राज्यातील आठ भारतीय पोलीस सेवेतील अधिकार्यांच्या बदल्या करून त्यांना नवीन पदस्थापना दिल्या आहेत. त्यातील आरतीसिंह यांच्या नवीन नियुक्तीचे आदेश जारी होणे शिल्लक राहिले आहे.
राज्य शासनाच्या गृह विभागातील सचिव व्यंकटेश भट यांच्या डिजिटल स्वाक्षरीने निर्गमित झालेल्या आदेशानुसार लोहमार्ग मुंबई येथील पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांना सह आयुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई येथे पाठवण्यात आले आहे.राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहा
आयुक्त शारदा वसंत निकम यांना विशेष पोलीस महानिरीक्षक अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स येथे नियुक्ती दिली आहे. नागपूर शहरातील पोलीस सह आयुक्त निसार तांबोळी यांना विशेष पोलीस महानिरीक्षक राज्य राखीव पोलीस बल नागपूर येथे नियुक्ती देण्यात आली आहे. अमरावती येथील पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांना सह पोलीस आयुक्त नागपूर शहर येथे पाठवण्यात आले आहे. पदस्थापनेच्या प्रतीक्षेत असलेल्या आणि केंद्रीय नियुक्ती वरून परत आलेल्या सुप्रिया पाटील यादव यांना विशेष पोलीस महानिरीक्षक आस्थापना पोलीस महासंचालक कार्यालय मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य राखीव पोलीस बलगट महाराष्ट्र चे विशेष पोलीस महानिरीक्षक राजीव जैन यांना विशेष पोलीस महानिरीक्षक सागरी सुरक्षा मुंबई येथे नियुक्ती मिळाली आहे. अपर पोलीस आयुक्त उत्तर विभाग बृहन्मुंबई अभिषेक त्रिमुखे यांना विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशासन पोलीस महासंचालक कार्यालय मुंबई येथे नियुक्ती मिळाली आहे. आरतीसिंह यांची बदली करण्यात आली आहे परंतु त्यांना नवीन पदस्थापना अद्याप देण्यात आले नाही. त्यांच्या पदस्थापनेचे स्वतंत्र आदेश नंतर पारित होतील असे या आदेशात लिहिले आहे.
