बालरक्षक गौरव पुरस्कारचे मानकरी पंडीत तोटेवाड 

नांदेड,(प्रतिनिधी)-पिंपळढव येथील भूमिपुत्र आणि पाकीतांडा (ता. भोकर) येथील जि. प.शाळेचे संवेदनशील शिक्षक पंडित नारायणराव तोटेवाड यांना ‘बालरक्षक कार्यगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र राज्य बालरक्षक टीमच्या पुढाकाराने शाळाबाह्य मुलांना शाळेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्वयंप्रेरणेने काम करणाऱ्या शिक्षकांना हा पुरस्कार देण्यात येतो. किनो एज्युकेशन सोसायटी मालेगाव व बालरक्षक टीम महाराष्ट्र यांच्यातर्फे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सोसायटीचे अध्यक्ष रईस शेख, राठोड, एससीइआरटीच्या माजी सहसंचालिका शोभा खंदारे, सहसंचालक ठाकरे,उपसंचालक तथा साहित्यिक पोपटराव काळे,एससीईआरटी विभाग प्रमुख अरुण जाधव, अकोला शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर आदींच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले. विनोद राठोड बालरक्षक यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!