भारताच्या इतिहासातील सर्वात क्षीण शक्ती असलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी

महाभारतात युद्धा अगोदर सुद्धा अनेकदा युद्ध होऊ नये यासाठी प्रयत्न झाले. शेवटी या समन्वय संधीसाठी श्रीकृष्णाने प्रयत्न केले, त्यावेळी द्रोपदी म्हणाल्या होत्या, केशवा आता युद्ध होणार नाही. त्यावर श्रीकृष्णांनी उत्तर दिले होते की, माझ्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा दुर्योधनावर विश्वास ठेव. कारण माझ्या प्रत्येक प्रयत्नाला अपयश यावे यासाठीच तो काम करत आहे. अर्थात युद्ध होणारच. याला जोडूनच भारतात आता असेच घडेल अशी परिस्थिती तयार झाली आहे. 140 कोटी भारतीयांच्या मनात आग असलेला भाग पीओके आता आपला राहणार नाही, असा प्रयत्न सुरू झाला आहे. यासाठी जनतेने सुद्धा तयार ठेवायला हवी. काश्मिरचे प्रकरण आंतरराष्ट्रीय स्तरावर आणुन डोनाल्ड ट्रम्पने युद्ध विरामाची घोषणा स्वत: केली. याचा अर्थ भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू ते आज नरेंद्र मोदी यादरम्यान सर्वात क्षीण शक्ती असलेला पंतप्रधान असे शब्द नरेंद्र मोदींसाठी वापरले तर त्यात चुकीचे काय?

ऑपरेशन सिंदुरची सुरूवात पहलगाममध्ये 26 पयर्टकांच्या मृत्यूनंतर झाली. मूळ मुद्दा आंतकवादाचा आहे. तो मागे पडला, निर्दोष पर्यटकांचे मृत्यू मागे पडले, पाकिस्तानच्या हल्ल्यात मरण पावलेल्या 15 नागरिकांचे मृत्यू मागे पडले आणि सुरूवात काश्मिर मुद्याच्या विषयावर झाली. खरे तर भारतीय जनता पार्टीच्या सरकारने पुर्वीपासूनच पीओके आमचा आहे, तो आम्ही परत मिळवून दाखवणार अशा वल्गना केल्या. भारताचा इतिहास ज्यांना माहित आहे, त्यांच्या मते सुद्धा पीओकेची जमीन आमचीच आहे. पाकिस्तान बळजबरी तेथे कब्जा करून आपला हक्क सांगत आहे. पण आता भारतीय जनता पार्टीला पीओकेची जमीन आपली आहे, हे विसरावे लागेल. आज वैशाख पौर्णिमो, तथागत गौतम बुद्ध जन्मोत्सव या दिवशी डीजीपीओ स्तरावर भारत-पाकिस्ताममध्येे बोलणी होणार आहे. त्यात काय ठरेल देव जाणे, परंतु भारताच्या इतिहासातील सर्वात क्षीण शक्ती असलेला पंतप्रधान म्हणून आम्ही नरेंद्र मोदींचा उल्लेख केला तर ते चुकीचे नाही. भारतात झालेल्या पंतप्रधानांमध्ये अगोदर देवे गौडा यांना कमजोर पंतप्रधान म्हटले गेले. आय.के. गुजराल कमी वेळेसाठी पंतप्रधान राहिले. चौधरी चरणसिंह यांनी तर कधीच सभागृह पाहिले नाही. त्या काळात सुद्धा काश्मिरच्या मुद्याबद्दल या तिघांनी कोण्या तिसऱ्या देशाला बोलू दिलेले नाही. त्यावेळी रशिया आणि अमेरिका महाशक्ती मानले जात असत आणि आजही त्या महाशक्ती आहेत. परंतु त्यांची सुद्धा त्यावेळी औकात नव्हती की ते काश्मिर मुद्यावर बोलू शकत नव्हते.

अतिरेक्यांनी मुंबईवर हल्ला केला होता तेव्हा सध्याचे पंतप्रधान गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, पाकिस्तानाच्या अतिरेक्यांनी मुंबईवर हल्ला केला आणि आमचे मंत्री अमेरिकेत गेले आणि ओबामासमोर रडू लागले, की आम्हाला मारले.. आम्हाला मारले. ही काय पद्धत असते काय. आज नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत, मग ते अमेरिकेकडे का गेले. किंवा अमेरिका तुमच्या प्रकरणामध्ये कशी घुसली याची काही उत्तरे आहेत काय. खरे तर भारतीय सैन्याने दाखविलेला पराक्रम अजून एक आठवडा चालला असता, तर पाकिस्तानला धडा शिकवण्याची चालून आलेली संधी आम्ही गमावली आहे. कारण त्यात अमेरिका आडवा आला. अमेरिकेमेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत-पाकिस्तानच्या भांडणांशी आम्हाला काही देणे-घेणे नाही, ते 1500 वर्षांपासून आपसात भांडत आहेत, ते त्यांचे पाहून घेतील. आणि अचानकच भारत-पाकिस्तानमधील युद्धाबंदीची घोषणा त्यांनीच केली. का पण. पाकिस्तानमध्ये आज जल्लोष साजरा केला जात आहे. स्वत:चा सत्यानाश होता होता वाचला म्हणून हा जल्लोष नाही, भारतापासून वाचल्याचा हा जल्लोष नाही, आयएमएफकडून आलेला कर्जाचा जल्लोष नाही, विदेशी कुटनितीमध्ये आम्ही भारताच्या पुढे जाण्याचा जल्लोष नाही, तर तंटामुक्ती अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मिर प्रकरण यात आणले म्हणून हा जल्लोष पाकिस्तान साजरा करत आहे. डोनाल्ड ट्रम्पने रविवारी केलेल्या पोस्टमध्ये मी काश्मिर संबंधाने समाधान काढता येईल, काय हे पाहणार असल्याचे सांगितले आहे. भारताच्यावतीने आमच्या शर्तीवर युद्धविराम झाला असे सांगितले जात आहे. पण कोणत्या आहेत त्या शर्ती देशासाठी जाहीर करा. आणि करत नाहीत तर त्यात सुद्धा काही तरी गोंधळ असेलच असे म्हटले तर चुकीचे काय.

भारत-पाकिस्तान हे दोन्ही देश माझ्या जवळचे आहेत. काश्मिर प्रश्नासाठी ते 1 हजार वर्षांपासून ते लढत आहेत. किंबहुना त्याचा काळ त्याही पेक्षा जास्त असेल. पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याचा निषेध त्यांनी केला, परंतु 1500 वर्षांपासून सुरू असलेला तणाव आता संपेल असे जाहीर केले. त्यानंतर आयएमएफ कर्ज देते आणि युद्धविरामाची घोषणा होते. पण ट्रम्पच्या मते युद्ध झाले असते तर निरागस लोकांचे मृत्यू दोन्ही देशात घडले असते आणि मला अर्थात अमेरिकेला दोन्ही देशांसोबत व्यापार वाढायवायचा आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टमुळे भारताची स्थिती जगात काय झाली असेल, जगात नरेंद्र मोदींचा डंका वाजतो म्हणणाऱ्यांना लाज वाटायला हवी कारण आयएमएफकडे निषेध नोंदवून सुद्धा पाकिस्तानाला मिळणारे कर्ज थांबले नाही. युद्ध हे वाईटच असते त्यामुळे दोन्ही पक्षांची वाट लागत असते. आमच्या मते नरेंद्र मोदी किंवा भारत सरकार यांनी युद्ध थांबविण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांना धन्यवाद द्यायले हवे होते आणि सोबतच पाकिस्तान भारतात असणाऱ्या प्रश्नांसाठी आम्हाला तिसऱ्या देशाची गरज नाही, हे पण जाहीर करायला हवे होते. मागच्या प्रत्येक पंतप्रधानांनी असेच केले आहे. परंतु अमेरिका बोलताच नरेंद्र मोदी बोलताच नरेंद्र मोदी यांच्या पायाखालची जमीन का सरकते हे त्यांनाच माहित. अमेरिकेने सांगलेली प्रत्येक अट ते का मान्य करतात याचे उत्तर देखील नरेंद्र मोदी यांच्याकडेच आहे.

एक हजार वर्षांपुर्वीचे भांडण सांगणाऱ्या डोनाल्ड ट्रम्पला भारताचा इतिहास आणि भुगोल दोन्ही माहित नाही. एक वर्षापुर्वी काश्मिरमध्ये चोला साम्राज्य होते आणि त्यावेळी तर पाकिस्तानचा जन्म होऊन 77 वर्षे झाली आहेत. त्या काळच्या काश्मिरच्या सिमा रशियापर्यंत पसरल्या होत्या आणि अशा अभ्यासाचा डोनाल्ड ट्रम्प काश्मिर प्रश्नात आडवा येत आहे आणि आमच्यावतीने काही बोलले जात नाही, ही दुर्देवाची बाब आहे. या प्रकरणात पाकिस्तानाचे काही नुकसान झाले नाही, खरे तर भयंकर नुकसान व्हायला हवे होते. त्याचे काही अतिरेकी मारले गेले त्याच्यासाठी त्यांनी अश्रूही गाळले, परंतु ते त्यांनीच पाळले होते. ते पुन्हा तयार होतील. पाकिस्तानला 2.3 मिलीयन डॉलरचे कर्ज मंजूर आणि 1 मिलीयन डॉलर लगेच प्राप्त झाले. आता आज होणाऱ्या डीजीपीएमओ बैठकीत अमेरिकेच्या सुचना भारत मान्य करणार आहे काय, कारण आजपर्यंत अमेरिकेने सांगितले म्हणूनच भारत तेल खरेदी करतोय, लढाऊ विमान खरेदी करतोय, हत्यार खरेदी करतोय म्हणजे अमेरिका सांगणार आणि आम्ही ऐकणार असेच असेल तर आजचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वात कमी शक्तीचे पंतप्रधान म्हटले तर आमची काय चूक. जुन्या काळात रशिया आणि अमेरिका हा महाशक्ती मानल्या जात होत्या तेव्हा जगात तटस्थ देशांची संघटना तयार करण्यामध्ये भारताचा सर्वाधिक पुढाकार आहे. रशिया पण आमचा मित्र आहे, परंतु भारताच्या विदेश नितीमध्ये त्यांनी कधीच खेळ केला नाही. पण अमेरिका भारताच्या विदेश नितीमध्ये दररोज खेळ खेळत आहे आणि आम्ही का शक्तीहीन आहोत, याचे उत्तर फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीच देऊ शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!