नांदेड(प्रतिनिधी)-मांजरा नदी पात्रात चोरी विक्री करण्याच्या उद्देशाने जमा करून ठेवलेली 150 ब्रास वाळू 9 लाख रुपये किंमतीची सापडली आहे.
हुनगुंदा ता.बिलोली या सज्जाचे तलाठी शिवलिंग गोविंद वाघमारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हुनगुंदा येथील मांजरा नदी पात्रात सहा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना दि.6 मे रोजी दुपारी 4 वाजेच्यासुमारास जमा करून ठेवलेली वाळू दिसली. ही वाळू चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने साठा करून ठेवण्यात आली होती. या वाळूचे एकूण मोजमाप 150 ब्रास आहे. त्याची किंमत 9 लाख रुपये होते. अज्ञात आरोपींविरुध्द कुंडलवाडी पोलीसांनी गुन्हा क्रमांक 91/2025 दाखल केला आहे. पोलीस उपनिरिक्षक गजेंद्र मांजरमकर अधिक तपास करीत आहेत.
मांजरा नदीच्या पात्रात 9 लाखांची वाळू चोरटी विक्री करण्यासाठी साठवलेली होती
