पाकिस्तान से लढते हुये जगीरा जैसा कमीना पण कैसे आयेगा?; उद्या युध्दाच्या परिस्थितीची रंगीत तालीम, वाजणार हुटर

का चित्रपटात जगीरा हा व्हिलन सांगतो मुझे लढने की हिम्मत तो जुटा लोंगे पर मेरे जैसा कमिना पन कहॉं से लाओ गे। असाच काहीसा भाग पाकिस्तान करत आहे. भारतीय रक्षा विभागाच्या वेगवेगळ्या संकेतस्थळांना हॅक करून त्यात असलेला डाटा चोरण्याचा प्रकार सुरू झाला आहे. त्यावर पाकिस्तानचे झेंडे लावले जात आहेत आणि यामुळेच 54 वर्षानंतर पहिल्यांदा युध्दाच्या संदर्भात नागरीकांची रंगीत तालीम उद्या 7 मे रोजी होणार आहे. ज्यामध्ये युध्दाच्या परिस्थितीत जनतेने काय करावे. स्वत: कसे वाचावे. इतरांना कसे वाचवावे. याचे प्रशिक्षण सुध्दा होणार आहे. भारतीय जनतेच्या मनात पाकिस्तानचा सत्यानाश व्हावा ही भावना आहेच. ही भावना केंद्र सरकारने पुर्ण करावी अशी अपेक्षा सुध्दा आहे.


आज बैसारन घाटी, पहलगाम येथे झालेल्या हल्याची तेरवी आहे. आज 13 दिवस पुर्ण झाले आहेत. परंतू अद्याप बेसारण घाटीचा बदला घेण्यात आलेला नाही. समोर आलेल्या बाबींप्रमाणे त्या दिवशी बैसारन घाटीत हल्ला करून अतिरेकी पसार झाले तेंव्हा दक्षीण काश्मिरमधून त्यांना कव्हर फायरिंग देण्यात आली. त्यातच ते पसार झाले होते. अतिरेकी तेवढच नाहीत ही सुध्दा बाब आता समोर आली आहे. जम्मुमधील कोटा बाल बल तुरूंग आणि काश्मिर येथील सेट्रेंल जेल यांच्यावर हल्ला करून तेथे बंद असलेले अतिरेकी पळवून नेण्याचा कट सुध्दा समोर आला आहे. या दोन्ही तुरूंगांची सुरक्षा सीआयएसएफ करते. सीआयएसएफचे महासंचालक हे गेली दोन दिवस जम्मु काश्मिरमध्ये आहेत आणि स्वत: तुरूंगांच्या सुरक्षेचे निरिक्षण करत आहेत आणि तेथे कोणी एखादा पक्षी सुध्दा आत येवू शकणार नाही याचा कडेकोट बंदोबस्त केला जात आहे. दुसऱ्या भागात पाकिस्तानचे हॅकर आता मैदानात उतरले आहेत. त्यांनी भारतीय सुरक्षा विभागांच्या वेगवेगळ्या संकेतस्थळांना आपल्या ताब्यात घेण्यास सुरूवात केली आहे. त्यातील काही संकेतस्थळांचे नुकसान झाले आहे. पण सायबर सुरक्षा करणाऱ्या यंत्रणा आता त्यासाठी दंड थोपटून तयार आहेत. तुरूंगावर हल्ला आणि संकेतस्थळांवरचा सायबर हल्ला म्हणजे चायना टाऊनमधील व्हिलन जगीराच्या शब्दातील खरा भाग आहे की, मुझे लढने की हिम्मत तो जुटा लोंगे पर मेरे जैसा कमिना पन कहॉं से लाओ गे। पण आम्ही, आमचा देश नैतिकतांवर विश्र्वास ठेवतो म्हणून आम्ही असे काही करणार नाही. आजच्या परिस्थितीत आम्ही पाणी बंद केल्याचे सांगितले. त्यात अनेक अडचणी आहेत. पाकड्यांनी शिमला करार रद्द केला. त्यांनी आमचा वायु मार्ग रोखला आणि आम्ही त्यांचा वायु मार्ग रोखला. त्यांनी आमच्यासोबत व्यापार बंद केला आणि आमची बंदरे बंद केली. त्यांनी आमचे नागरीक परत पाठविले आम्ही त्यांचे परत पाठविले. म्हणजे हा हल्ला प्रतिहल्ला सुरू आहे. आयओसी देशांमधील 57 देश पाकिस्तानच्या सोबत आहेत. चिन त्यांच्यासोबत आहे. अमेरिका त्यांच्यासोबत आहे. आमच्या सोबत रशिया आहे. युध्द झालेच तर आमचे वाघ त्यांचा गळा चिरडून टाकतील. परंतू हे सुध्दा लक्षात ठेवावे लागेल. की युक्रेनला आठ दिवसात नैस्तनाबुत करतो म्हणणारा रशिया आजपर्यंत ते स्वप्न पुर्ण करू शकला नाही. सामरीक दृष्टीकोणातून आम्ही नक्कीच पाकिस्तानपेक्षा वरचढ आहोत पण उनके जैसा कमिना पण कहा से लायेंगे। भारताचा एक सैनिक त्यांच्या भागात गेला तेंव्हा ते तर आजपर्यंत बोलत नव्हते. आता काल त्यांचा एक रेंजर भारतीय सैन्याच्या हाती लागला आहे. आता त्यांना बोलावेच लागेल.
जम्मू काश्मिरमध्ये काही ठिकाणी टिफीन बॉम्ब आणि बकेट बॉम्ब सापडले आहेत. त्यात आयइडीसारखे स्फोटके आहेत. परंतू त्यांना थांबविण्यात आले आहे. आजच्या परिस्थितीत दोन्ही देशांसाठी युध्द हे गुंतागुंतीचे आहे. परंतू भारतीय जनतेच्या मनातील मनिषा पाकड्यांचा सत्यानाश करण्यातच आहे आणि ही मनिषा पुर्ण करण्याची जबाबदारी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीच आहे. पाहुया काय होईल ते.
उद्या वाजणार सायरन
54 वर्षाअगोदर सन 1971 मध्ये पाकिस्तानने आमच्यासोबत पंगा घेतल्यानंतर तेंव्हाच्या पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानसोबत युध्द पुकारून पाकिस्तानचे दोन तुकडे केले आणि जगात बांग्लादेश हा नवीन देश तयार झाला. त्यावेळी सार्वजनिक सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या. आजच्या परिस्थितीत तांत्रिकता अत्यंत प्रगत झालेली आहे. तरी पण 54 वर्षानंतर पुन्हा एकदा सायरन वाजणार आहे. याची तारीख उद्या दि.7 मे 2025 ही आहे. सर्व साधारण पणे प्रशासकीय इमारती, पोलीस मुख्यालय, पोलीस ठाणे, फायर स्टेशन या ठिकाणी सायरन असतात. केंद्र सरकारने व राज्य सरकारने सर्व कार्यालयांना सायरन दुरूस्त करून घेण्याच्या सुचना केलेल्या आहेत आणि उद्या या सायरनचा आवाज संपूर्ण भारतीय जनतेला ऐकायला मिळणार आहे. यामध्ये सायरन वाजल्यानंतर सर्वसामान्य नागरीकांनी काय करावे, कोठे जावे, स्वत: चा जीव कसा वाचवावा इतरांना जीव वाचविण्यासाठी कशी मदत करावी अशा अनेक पध्दती अशा अनेक पध्दती त्यात सर्वसामान्य जनतेला, विद्यार्थ्यांना, विद्यार्थींनींना शिकवल्या जाणार आहेत. युध्दाच्या वेळेस रात्री ब्लॅकआऊट केला जातो. तो काय असतो, त्यात कसे वागावे, काय करावे याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. मिसाईल हल्ला, हवाई हल्ला झाला तर जनतेने काय करावे याबद्दल मार्गदर्शन होणार आहे. भारतातील महत्वाच्या जागांना शत्रु सैन्याच्या नजरेपासून कसे वाचवता येईल यासाठी काय प्रयत्न करावे लागता. हे सांगितले जाणार आहे. पाकिस्तानी दोन गुप्त हेर भारतीय सुरक्षा रक्षकांनी पकडले आहेत. याचा अर्थ आज बैसारन घाटीच्या हल्याची तेरवी असतांनापर्यंत काही केले नाही हा लागलेला वेळ पाकिस्तानने तयारीत घालविल्याचे दिसत आहे. उशीर आपल्यालाच झाला काय हा प्रश्न आता समोर येत आहे. उद्या सर्व जनतेने सायरनची रंगीत तालीम असली तरी त्या रंगीत तालीमेला पुर्ण प्रतिसाद द्यावा अशी वास्तव न्युज लाईव्हची सुध्दा विनंती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!