नांदेड(प्रतिनिधी)-वजिराबाद भागातील एक दुकान फोडून चोरट्यांनी मोबाईल, स्मार्ट वॉच असा 32 हजार 750 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. हिमायतनगर येथील एक किराना दुकान फोडून चोरट्यांनी 12 हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली आहे. लोहा येथील आठवडी बाजारात 30 हजार रुपये किंमतीचा एक मोबाईल चोरट्यांनी लांबवला आहे.
मोहम्मद नावीद आजीम हमद इर्शद यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची आरतीया हाईटस् बाफना येथे दुकान आहे. 30 एप्रिल रोजी सकाळी 4.30 वाजेच्यासुमारास तीन चोरट्यांनी तोंडाला मास्क व रुमाल बांधून त्यांच्या दुकानाचे शटर वाकून आतमध्ये प्रवेश केला आतील मोबाईल, स्मार्ट वॉच आणि काही रोख रक्कम असा एकूण 32 हजार 750 रुपयंाचा ऐवज चोरून नेला आहे. वजिराबाद पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 181/2025 दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक माडगे अधिक तपास करीत आहेत.
हाजीर खान सलाल खान यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हिमायतनगरमधील उमर चौक येथे त्यांची किराणा दुकान आहे. कोणी तरी चोरट्यांनी 28 एप्रिलच्या सकाळी 8 ते 30 एप्रिलच्या सकाळी 8 वाजेदरम्यान त्यांच्या दुकानाच्या मागचे दार तोडून दुकानात प्रवेश केला आणि किराणा दुकानातील 12 हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली आहे. हिमायतनगर पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 88/ 2025 प्रमाणे दाखल केली आहे. सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक जाधव अधिक तपास करीत आहेत.
किरवडा ता.लोहा येथील शेतकरी भिमराव संभाजी जोंधळे हे 29 एप्रिल रोजी दुपारी 3.40 वाजेच्यासुमारास लोहा येथील आठवडी बाजारात भाजीपाला खरेदी करत असतांना त्यांच्या शटरच्या समोरील खिशात ठेवलेला 30 हजार रुपये किंमतीचा मोबाईल कोणी तरी चोरट्यांनी चोरला आहे. लोहा पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 123/2025 प्रमाणे दाखल केली आहे. पोलीस अंमलदार राठोड अधिक तपास करीत आहेत.
वजिराबाद भागात दुकान फोडले; हिमायतनगर येथे किराणा दुकान फोडले; लोहा येथील आठवडी बाजारात मोबाईल चोरी
