नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातून एक पोलीस उपअधिक्षक, एक पोलीस निरिक्षक, चार पोलीस उपनिरिक्षक, एक सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक आणि तीन पोलीस अंमलदार अशा दहा जणांना आज पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी निरोप देतांना सेवानिवृत्तीनंतरच्या जीवनासाठी शुभकामना प्रेषित केल्या.
माहुर पोलीस उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक दादाराव सखाराम शिनगारे, किनवटचे पोलीस निरिक्षक सुनिल श्रीनिवास बिर्ला, पोलीस नियंत्रण कक्षातील पोलीस उपनिरिक्षक मारोती मोतीराम रावळे, सुर्यकांत मारोती कांबळे, पोलीस ठाणे इतवारा येथील ज्ञानोबा मारोती गिते, जीपीयुमधील राम शिवसांब गांजुरे, जिल्हा विशेष शाखेतील ए.एस.आय. शामसिंह रामसिंह ठाकूर, हदगाव येथील पोलीस अंमलदार खाकोबा मानेजी चिंतले, पोलीस मुख्यालयातील शिवाजी दगडोबा वाठोडे, मांडवी येथील उकंडराव दामदया राठोड हे 10 पोलीस सेवानिवृत्त झाले आहेत.
पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी सर्व सेवानिवृत्तांना पुष्पगुच्छ, शाल,श्रीफळ देवून सर्व सेवानिवृत्तंाचा कुटूंबासह सन्मान केला. भविष्यातील जीवनात तुमच्या अडचणींसाठी आम्ही सदैव तयार राहू असे सांगितले. याप्रसंगी पोलीस उपअधिक्षक मुख्यालय डॉ.अश्र्विनी जगताप, पोलीस कल्याण विभागाचे पोलीस निरिक्षक नामदेव रिठ्ठे, महिला सहाय कक्षातील पोलीस उपनिरिक्षक स्नेहा पिंपरखेडे यांच्यासह अनेक अधिकारी, पोलीस अंमलदार सेवानिवृत्तांचे कुटूंबिय मोठ्या संख्येत हजर होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन स्नेहा पिंपरखेडे यांनी केले. पोलीस अंमलदार सविता भिमलवाड यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले.
एक पोलीस उपअधिक्षक, एक पोलीस निरिक्षक, चार पोलीस उपनिरिक्षक यांच्यासह दहा पोलीस सेवानिवृत्त
