नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांनी पाच ठिकाणी झालेल्या चोऱ्या उघडकीस आणल्या असून 3 लाख 85 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
इतवारा पोलीस उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर, पोलीस उपनिरिक्षक डी.ई.चव्हाण, पोलीस अंमलदार मोरे, भिसे, कलंदर, शिरगिरे, माळगे, शिरमलवार यांनी बळीरामपूर भागातून सोमयदिप उर्फ लाल्या वसंत जोंधळे (19), अमोल उर्फ बंटी अनिल नरवाडे(21), अजय पुंडलिक नवघडे (20) आणि अनिल गणपत नवघडे (33) आणि गंगाधर पुंडलिक नवघडे (25), विजयनगर गोविंद कॉलनी सिडको येथील विनोद उत्तम हनवते (32) यांना ताब्यात घेतल्यानंतर 2024 चे तीन चोरीचे गुन्हे आणि 2025 चे दोन गुन्हे अस पाच गुन्हे उघडकीस आले आाहेत. या चोरट्यांकडून 5 क्विंटल सोयाबीन किंमत 20 हजार रुपये, दोन पाण्याच्या मोटारी किंमत 10 रुपये, एक समशिर्बल मोटार किंमत 10 हजार रुपये, एक 90 हजार रुपयांची दुचाकी गाडी, दुसरी एक दुचाकी गाडी किंमत 1 लाख 25 हजार रुपये आणि एक ऍटो 1 लाख 30 हजार रुपये किंमतीचा असा एकूण 3 लाख 85 हजार रुपये किंमतीचा चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नांदेड ग्रामीण पोलीसांनी पाच चोरीचे गुन्हे उघडकीस आणले
