धर्माबाद पोलीसांनी 48 तासात गुन्हा उघडकीस आणून 100 टक्के जप्ती केली

नांदेड(प्रतिनिधी)-धर्माबाद येथून 16 लाख 69 हजार 150 रुपयांचा हरभरा भरून गायब झालेला ट्रक धर्माबाद पोलीसांनी 100 टक्के साहित्यासह जप्त करून तीन जणांना अटक केली आहे.
दि.28 फेबु्रवारी रोजी ओमप्रकाश नंदकिशोर कासट यांनी एका ट्रकमध्ये 595 हरभऱ्याचे पोते किंमत 16 लाख 69 हजार 150 रुपये किंमतीचे भरून नागपूर येथील व्यापाऱ्याला देण्यासाठी पाठविले. परंतू ते तेथे पोहचलेच नाहीत. या प्रकरणी धर्माबाद पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 58/2025 दाखल करण्यात आला होता. पोलीस उपअधिक्षक संकेत गोसावी, धर्माबादचे पोलीस निरिक्षक बाळासाहेब राकडे, सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक धिरज चव्हाण यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक बालाजी गायकवाड, पोलीस उपनिरिक्षक प्रियंका पवार, पोलीस अंमलदार विलास मुस्तापुरे, महेश माकुरवार, संतोष संगेवार, सचिन गडपवार, आमेश्र्वर नागुलवार, राजेंद्र सिटीकर, दिपक ओढणे यांनी या प्रकरणातील उपलब्ध माहितीच्या आधारावर, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक मदत यांचा आधार घेवून गुन्हा दाखल झाल्यानंतर 48 तासाच्या आत तो ट्रक पकडला. त्या ट्रकवर जालना येथील दुसऱ्या एका ट्रकचा नंबर सांगून, ट्रकला खोटी नंबर प्लेट लावून धर्माबाद ते नागपूर हे भाडे मिळवले आणि ते गायब केले होते.
पोलीसांनी या प्रकरणी प्रभाकर विश्र्वनाथ घुगे (40), ट्रक चालक, रा.मुळगाव वाई ता.सेलू जि.परभणी ह.मु.खैरी प्लॉट जिंतूर, बालाजी खुशाल जायभाये (28) रा.अंगरगाव ता.जिंतूर जि.परभणी आणि बबन पंढरीनाथ घुगे (53) रा.अंबरवाडी ता.जिंतूर या तिघांना पकडले आहे. पोलीसांनी केलेल्या या मेहनतीला 48 तासात आलेल्या या यशामुळे हरभऱ्याचे 595 पोते किंमत 16 लाख 69 हजार 150 रुपयांचा 100 टक्के ऐवज जप्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!