निवडणूक कर्तव्यावर असताना मृत्यू झालेल्या बिएलओंच्या वारसांना सानुग्रह अनुदान 

नांदेड- निवडणूक काळात कार्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आकस्मिक मृत्यूनंतर त्यांच्या वारसांना निवडणूक आयोगाकडून  सानुग्रह निधी देण्यात आला.

विधानसभा सार्वत्रिक व लोकसभा पोट निवडणूक 2024 च्या पूर्व तयारीच्या अनुषंगाने 90 देगलूर विधानसभा मतदारसंघातील सर्व बिएलओची  बैठक दिनांक 17 ऑक्टोबरला  बोलविण्यात आलेली होती. सदरील बैठक आटोपून परत जात असताना कुन्मारपली मतदार केंद्र क्रमांक 350 चे बि. एल. ओ. श्री. योगेश शेषेराव पाटिल यांचा अपघाती मृत्यु झाला होता.

निवडणूक कर्तव्यावर असताना कर्मचाऱ्याचा  मृत्यू झाल्यास भारत निवडणूक आयोगाकडून 15 लक्ष इतके सानुग्रह अनुदान देय आहे. त्यानुषंगाने मयत बिएलओ यांचा सानुग्रह अनुदानाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी नांदेड यांच्या मार्फत शासनाकडे सादर करण्यात आलेला होता.

तत्कालिन जिल्हाधिकारी अभिजित राऊत, उपजिल्हाधिकारी निवडणूक  राजकुमार माने , 90 देगलूर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती क्रांती डोंबे सहा. निवडणूक निर्णय अधिकारी भरत सुर्यवंशी इत्यादीनी सदर अनुदानासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले.

शासनाकडे सादर केलेला प्रस्ताव दिनांक 17.02.2025 रोजी मंजुर केले आहे. दिनांक 10.03.2025 रोजी सहा. जिल्हाधिकारी अनुष्का शर्मा यांच्या हस्ते संबधित कर्मचारी यांचे वारस पत्नी प्रणिता योगेश बिरादार यांना 15 लक्ष रुपयाचा धनादेश देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!