नांदेड(प्रतिनिधी)-एका मोठ्या अधिकाऱ्याची जबाबदारी पार पाडणाऱ्या तीन पोलीस अंमलदारांची बदली माहूरला झाल्यानंतर सुध्दा त्यांना अद्याप कार्यमुक्त करण्यात आलेले नाही. बदलीच्या आदेशात तात्काळ कार्यमुक्त करून पुर्तता अहवाल सादर करावा असे लिहिलेले आहे. याच पध्दतीने एक सहाय्यक पोलीस निरिक्षक अगोदर सर्वसाधारण बदल्यांमध्ये नागपूर शहर, त्यानंतर बदल्यांच्या प्रक्रियेत नैपुण्य असणाऱ्या सहाय्यक पोलीस निरिक्षकाने आपली बदली छत्रपती संभाजीनगर येथे करून घेतली. तरी पण त्यांना अद्याप कार्यमुक्त करण्यात आलेले नाही.
मागील आठवड्यात स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस अंमलदार राहुल लाठकर बकल नंबर 511, आतंकवादी विरोधी पथक(रिंदा पथक) येथील तानाजी येळगे बकल नंबर 1601 आणि विमानतळ पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार अंकुश लांडगे बकल नंबर 1335 यांची विनंती वरून बदली माहुर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. या बदलीच्या आदेशात स्थानिक गुन्हा शाखा, एटीबी आणि विमानतळ येथील प्रभारी अधिकारी यांनी पोलीस अंमलदारांना बदलीच्या ठिकाणी तात्काळ कार्यमुक्त करून पुर्तता अहवाल पोलीस अधिक्षक कार्यालयात सादर करावा असेही लिहिलेले होते. या आदेशावर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांची स्वाक्षरी आहे. या आदेशाचा जावक क्रमंाक 1708 असा आहे.
तात्काळ कार्यमुक्त म्हणजे तात्काळच असते. तात्काळाला काही विहित कालावधी नाही. तरीपण अद्याप या पोलीस अंमलदारांना का कार्यमुक्त करण्यात आले नाही. याचा उलगडा होत नाही. जिल्ह्यात पोलीस अधिक्षक हे सर्वात मोठे अधिकारी आहेत आणि त्यांच्या आदेशाची अवहेलना करणे प्रभारी अधिकाऱ्यांसाठी त्रासा चा विषय आहे. तरी पण प्रभारी अधिकाऱ्यांनी त्या तिन पोलीस अंमलदारांना कार्यमुक्त का केले नाही याचा उलगडा होत नाही. सांगितले जाते की, ते तिन्ही पोलीस अंमलदार कोण्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्यावतीने वाळूचा विषय हाताळत होते. कोण आहेत ते वरिष्ठ अधिकारी याचा शोध मात्र लागला नाही.
अशाच प्रकारे लोकसभा निवडणुकीपुर्वी सर्वसाधारण बदल्यांमध्ये सहाय्यक पोलीस निरिक्षक चंद्रकांत पवार यांची बदली नागपूर शहर येथे झाले होती. निवडणुकीच्या काळात त्यांना कार्यामुक्त न करतांना पळ वाट शोधली गेली आणि त्यामुळे त्यांना नागपूर शहर येथे बदलीवर कार्यमुक्त करण्यात आले नाही. त्यानंतर तर त्यांनी प्रयागराजची एक वारी केली आणि त्यांची बदली विनंती या सदरात छत्रपती संभाजीनगर येथे झाली. तरी पण त्यांना बदलीवर कार्यमुक्त करण्यात आले नाही. हा त्या प्रयागराज वारीचा परिणाम आहे काय? असेलही तरी पण प्रत्येक अधिकाऱ्याचा जिल्हा आणि पोलीस परिक्षेत्र येथे वास्तव करण्याचा विहित कालावधी आहे. काही खात्रीलायक सुत्र सांगतात. नांदेड जिल्ह्यातील अनेक पोलीस अधिकारी त्यांच्यामुळे त्रासले आहेत. तरी पण त्यांना येथे का सांभाळले जात आहे. हा विषय पीएचडी करण्यासारखा आहे.
कालच आयसीसी क्रिकेट स्पर्धा संपल्या. 22 मार्चपासून पुन्हा आयपीएल क्रिकेट स्पर्धा सुरू होणार आहेत. आयसीसी क्रिकेट स्पर्धांमध्ये कोणी-कोणाचा हिशोब केला. हे तर कळले नाही कारण आयसीसी स्पर्धांदरम्यान नांदेड जिल्ह्यात क्रिकेट सट्याचा एकही गुन्हा दाखल झाला नाही. परंतू पुढे येणाऱ्या आयपीएल स्पर्धा यांच्या हिशोब करण्यासाठी या चौघांना बदली झाल्यावर कार्यमुक्त केले नाही काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
संबंधित बातमी..
पोलीस अंमलदार तानाजी येळगेसह तीन पोलीस माहूरच्या मालकाच्या सेवेत
