हिमायतनगर पोलीसांनी चोर पकडला

नांदेड(प्रतिनिधी)-जनता कॉलनी हिमायतनगर येथे जानेवारीमध्ये झालेल्या चोरीची घटना हिमायतनगर पोलीसांनी उघडकीस आणली आहे.
दि.2 जानेवारी ते 3 जानेवारीच्या रात्री विलास लक्ष्मण शिंदे रा. जनता कॉलनी हिमायतनगर यांच्या घरात कोणी तरी चोरट्यांनी प्रवेश करून कपाटातील रोखी रक्कम 17 हजार 500 रुपये चोरून नेले होते. याप्रकरणी हिमायनगर येथे गुन्हा क्रमांक 2/2025 दाखल झाला होता.
हिमायतनगरचे पोलीस निरिक्षक अमोल भगत यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक शंकर जाधव, पोलीस अंमलदार नागरगोजे आणि सदावर्ते यांनी हिमायतनगर येथील मसु व्यंकटी गायकवाड(40) यास ताब्यात घेवून त्याची चौकशी केली असात विलास शिंदे यांच्या घरातील चोरी त्याने केल्याचे कबुल केले आहे. त्याच्याकडून 14 हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. गुन्हेगार मसु गायकवाडने तेलंगणा राज्यातील भैसा या पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुध्दा चार घरफोड्या केल्या असल्याची माहिती उघड झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!