समाजवादी पक्षाचे नेते आबु आझमी यांनी औरंगजेबची प्रशंसा केली म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. भारतीय कायद्याच्या कोणत्या कलमानुसार औरंगजेबची प्रशंसा करणे हा गुन्हा आहे. 400 वर्षापुर्वीच्या औरंगजेबची आठवण फक्त याच्यासाठी केली जाते की, आपल्या कपड्यावर असलेली गरीबी, बेरोजगारी, रुपाची किंमत, भारतावरील कर्ज आणि भ्रष्टाचार लपवता यावा. तसेच धु्रवीकरण करून निवडणुका जिंकता याव्यात. असा ही प्रश्न आम्हाला पडला की, औरंगजेबने 58 कोटी ब्राम्हण मारले तर आमचे पुर्वज कसे जगले. ज्यातून आम्ही आज उभे राहिलो.
400 वर्षापुर्वीच्या औरंगजेबची प्रशंसा आज आबु आझमी यांना महागात पडली. ठिक आहे म्हणतात ना सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. तोच प्रकार आबु आझमी सोबत घडला. आपण थोडासा ईतिहास पाहुया. पुर्वीच्या काळात राजेशाही होती. कधी हिंदु राजे होते तर कधी मुस्लिम राजे होते. फक्त मनाला मानण्यापुरता तो भाव तेंव्हाच्या जनतेत होता की, राजा हिंदु आहे. म्हणजे सर्व काही चांगले आहे. असाच काहीसा भाव मुस्लिम राजे असतांना मुस्लिम समाजाच्या मनात होता. पण प्रत्येक्षात राजा हा राजवाड्यातच राहत होता. तो कोणताही असेल आणि जनता झोपडीतच राहत होती मग ती कोणतीही असेल. दोन्ही समाजांना राजाकडून एकच न्याय होता. तो म्हणजे चुक झाली तर हत्तीच्या पायाखाली देवून त्याला मृत्यूदंड दिला जात होता. म्हणूनच म्हणतात ईतिहास हा शिकण्यासाठी असतो, धडे घेण्यासाठी असतो. राजांच्या जाचातून मुक्ती मिळण्यासाठीच पुढे लोकतंत्र आले. औरंगजेब सर्वात वाईट राजा होता असे या चर्र्चेत आपण मानुया परंतू तो 400 वर्षापुर्वी होता. त्याचा हिशोब ईतिहासकारांनी आपल्या शब्दातून केलेला आहे. पण आज का आठवतो 400 वर्षापुर्वीचे औरंगजेब. त्याचे उत्तर असे आहे की, आजच्या औरंगजेबांना लपवता यावे. याची अनेक उदाहरणे सांगता येतील. सर्वात जवळचे उदाहरण म्हणजे एका मंत्र्याच्या जवळच्या औरंगजेबाने एका सरपंचाचा निघृण खून केला. तो खून करतांनाचे व्हिडीओ तयार केले आणि त्यात काय-काय आहे लिहुन आम्ही आमच्या लेखणीची किंमत कमी करू इच्छीत नाही. तो सरपंच करोडोच्या हप्ता वसुलीमध्ये अडसर ठरत होता. म्हणून त्याला मृत्यूदंड देण्यात आला. याच सरकारने तयार केलेल्या विशेष तपास पथकाने स्वत: सांगितले आहे की, तो मारेकरी मंत्र्यांच्या अगदी जवळचा आहे. म्हणून 400 वर्षापुर्वीची आठवण करून आजचे औरंगजेब लपविण्यासाठी त्या औरंगजेबाची चर्चा काही जणांना आवश्यक आहे.

औरंगजेबांनी आपल्या वडीलांची हत्या केली, भावांची हत्या केली हे अगदी सत्य आहे. यात कोणीही नाकारण्याचा कोणत्याही प्रश्नच नाही. पत्रकार अशोक पांडे यांनी कश्मिर आणि कश्मिरी पंडीत तसेच कश्मिरनामा अशी दोन पुस्तके लिहिली आहेत. कश्मिमर येथील राजतरंगीनीमध्ये कश्मिरमधील ईतिहासकार जोनाराज लिहितात प्रत्येक राजाचा भाऊ हा साप असतो. त्याला दुर ठेवायचे असते किंवा त्याचा वधच करायचा असतो. तरच राजाचे राज्य उत्तम चालते. जोनाराज यांनी लिहिलेला हा ईतिहास हिंदु राजांच्या काळातला आहे. आज निवडणुका होतात. दोन-चार वेळेस तुम्ही हारलात तरी पाचव्या वेळी जिंकण्याची शक्यता असते, जिंकता येते आणि राज्य मिळते. पण त्यावेळी राजाला मारल्याशिवाय राजाची गादी मिळणे अशक्यत होतो. नाही तर राजाचे लहान भाऊ म्हणून आपल्या जीवनभर वावरावे लागायचे. यदा कदा राजाचा मृत्यू जरी झाला तरी राजाचा ज्येष्ठ पुत्र राजा होत असे. म्हणजे पुन्हा राजाच्या भावांना फक्त सेवाच मिळत होती. खुप जुन्या उदाहरणात न जाता पंजाबमधील डोगरा राज्याच्या मध्ये घडलेली शत्रुता बंधूूंमधलीच होती. याही पेक्षा जुने उदाहरण आहे. अजात शत्रु या राजाने आपले वडील बिंबीसार यांना आपल्याला सत्तेच्या गादीवर बसता यावे म्हणून तुरूंगात टाकले होते. त्यांना जेवण दिले जात नसे. त्यांच्या पत्नी त्यांच्यासाठी आपल्या केसांमध्ये भाकरी लपवून घेवून जात होत्या आणि आपल्या शरिराला चटणीसारखा पदार्थ लेप म्हणून लावायचा आणि त्याला चाटून बिंबीसार राजांनी भाकरी खायची. असा हा घटनाक्रम आहे. बिंबीसार राजाच्या हजामतीसाठी जाणाऱ्या माणसाला असा आदेश होता की, बिंबीसार राजाचे नख या पध्दतीने काढायचे ज्यामुळे त्यांना जखमा होतील आणि त्यावर मिठ टाकायचे. अशा परिस्थिती हा राजा आपला मुलगा राजा असतांना जगला. पुढे अजात शत्रुला पुत्र प्राप्ती झाली. त्यावेळी त्याला बाप काय असतो तो कळले आणि पळत पळत बापाला सोडविण्यासाठी तुरुंगाकडे गेले असतांना तोपर्यंत बिंबीसार यांनी या जगाचा निरोप घेतला होता.
भारतात ज्या-ज्या ठिकाणी राजशाही होती. त्या-त्या ठिकाणी असेच घडले आहे. महाराष्ट्रात सुध्दा पेशवाईच्या कालखंडात 12 वर्षाच्या माधवराव पेशवांना राजा केल्यानंतर ध चा मा कोणी केला होता. याची आठवण औरंगजेबाची आठवण जशी आहे तशी याची पण राहायला हवी. फक्त विष पेरण्यासाठी 800 वर्षापुर्वीच्या औरंगजेबाची चर्चा घडविणे हे काही आजच्या परिस्थितीत, भारताच्या संविधानाला अभिप्रेत नाही. पण औरंगजेबाची आठवण का येते. त्यावर आरोप आहे औरंगजेबचे वडील शहाजहान राज्याची सत्ता दाराशिकोहला देणार होते. पण औरंगजेबच्या मनातील सत्तेची भुक त्याने दाराशिकोहचाच खून केला नाही तर आपल्या इतर भावांचा खून करून तो सत्तेवर आला. अकबरपुत्र सलीमने सुध्दा आपल्या वडीलांसोबत केलेला विद्रोह जगाला माहित आहे. अकबरची पत्नी जोधा हिच्यासाठी तिच्या घरात श्रीकृष्णाचे मंदीर होते. जे विसरुन चालेल काय? आजही भावा-भावांमध्ये, वडील आणि पुत्रामध्ये, भाऊ बहिणींमध्ये संपत्तीसाठी वाद होतात आणि ते सुध्दा एवढे विकोपाला जातात की, त्यात खून होतात. प्रत्येक राजामध्ये चांगले काही गुण आणि काही वाईट गुण होतेच. पण औरंगजेबचे हे सत्य कोणी सांगत नाही की, तो टोप्या बनवत होता, कुराण जिल्द बनवत होता आणि त्या विक्री करून आपला खर्च भागवत होता. हे सुध्दा सत्य आहे. मरण पावला तेंव्हा माझ्या मालकीचे जे काही आहे ते सर्व दान करा असे तो म्हणाला होता. याची आठवण का नाही होत. औरंगजेबाने मंदिरे तोडली याला नकाराताच येत नाही. परंतू अनेक मंदिरांना औरंगजेबाने दान दिलेले आहे. याचा विसर का होता पण. कश्मिरमध्ये एक राजा हर्ष होता. कल्हन या ईतिहाकाराने लिहिलेले आहे तो मंदिर तोडत होता. त्याने तर आपल्या आत्यासोबत केलेले वर्तन आपल्या लिखाणात लिहुन आम्ही आमच्या लेखणीची किंमत कमी करू इच्छीत नाही.

औरंगजेब वाईट होता म्हणून सर्व मुस्लीम समाज वाईट आहे काय? काही हिंदु राजा पण वाईट होते म्हणून सर्व हिंदु समाज वाईट का होत नाही. त्या राजांनी केलेले कृत्य हे धर्मासाठी नसून सत्तेसाठी आहेत. औरंगजेबचा सेनापती सवाई राजा जयसिंह होते. याचा अर्थ काय? सवाई राजा जयसिंह यांना आपल्या धर्माची चिंता नव्हती काय?
भारतीय जनता पार्टीचे आवडते ईतिहासकार आहेत यदुनाथ सरकार यांची ख्याती अशी आहे की, त्यांनी घटना कधीच बनावट लिहिली नाही. जी सत्य घटना आहे तशीच्या तशी लिहिली. त्या घटनेचे विश्लेषण करतांना मात्र त्यांनी त्यात आपली मते आणली आहेत आणि हे प्रत्येक विश्लेषकाचे काम आहे. यदुनाथ सरकार यांनी लिहिलेले औरंगजेब हे पुस्तक भारतीय जनता पार्टीच्या संकेतस्थळावर पिडीएफ स्वरुपात अपलोड केलेले आहे. त्या पुस्तकातील पान क्रमांक 467 वर औरंगजेबचे राज्य हिंदुसाठी वाईट होते असे लिहिलेले आहे. लगेच त्या पुस्तकातील पान क्रमांक 468 वर औरंगजेबचे राज्य मुस्लिमांसाठी सुध्दा वाईटच होते असे लिहिले आहे.यदुनाथ सरकार यांचे हे पुस्तक कॉंगे्रसच्या संकेतस्थळावर अपलोड असते तर काय धिंगाणा या देशात झाला असता. अकबर या पुस्तकात आमचे आदरणीय छत्रपती शिवाजी राजांनी एक पत्र औरंगजेबला लिहिलेले आहे. त्यात ते म्हणतात अकबरांनी 52 वर्ष या देशाचे राज्य चालविले. त्यात कोणत्या समाजाचा कोण व्यक्ती आहे. याला कधीच महत्व दिले नाही. सर्वांच्या भल्यासाठी काम केले म्हणून या सर्वांनी अकबरांना जगतगुरू अशी पदवी दिली. या पत्राची का आठवण केली जात नाही. जे आमच्या राजांनी औरंगजेबला लिहिले होते.

असे म्हणतात औरंगजेबने 40 मन यज्ञोपवीत(जानव) जाळले. त्यावेळेसच्या त्या जानवाचा वजनाचा विचार केला तर औरंगजेबने 58 कोटी ब्राम्हण मारले. त्यावेळेसच्या लोकसंख्येचा विचार केला तर ती 18 कोटी होती. त्यात 1.5 कोटी ब्राम्हण होते. त्यातील महिला आणि बालकांना वगळले तर 30 ते 40 लाख पुरूष ब्राम्हण शिल्लक राहतात. मग औरंगजेबाने 58 कोटी ब्राम्हण मारण्यासाठी ते बाहेरच्या देशातून आयात केले होते काय? याचे उत्तर कोण देईल. जर औरंगजेबने 58 कोटी ब्राम्हण मारले तर आज आम्ही कसे जन्मलो, आमचे पुर्वज कसे जीवंत राहिले. या चाही विचार करावा लागेल. त्यापेक्षा मोठा विचार आमित मालवीयचे पुर्वज कसे जगले ज्यामुळे त्यांचा जन्म झाला या ईतिहासाचा शोध सुध्दा घ्यावा लागेल.

प्रत्येक राजाचे घरचे नाव आहे. औरंगजेबाचे पण होते. औरंगजेबाच्या घरचे नाव नौरंग बिहारी असे होते. औरंग म्हणजे गादी, जेब म्हणजे शोभा. ज्या गादीची शोभा औरंगजेबमुळे वाढली म्हणूून ते नाव औरंगजेब झाले. नौरंग बिहारी या शब्दाचा अर्थ श्रीकृष्ण आहे. नौरंग बिहारी नावाने औरंगजेबाने अनेक छंद लिहिले आहेत. त्यांची एक हिंदु पत्नी होती. त्यांचे नाव उदयपुरीबाई. त्यांच्यासाठी औरंगजेबने लिहिलेला एक छंद असा आहे की, “तव गुण उदय रवी किनो, याही ते कहत तुम कौ बाई उदयपुरी ‘ या छंदामध्ये उदयपुरीबाई बद्दल निखळ प्रेम आहे. औरंजेब म्हणतात त्याप्रमाणे उदयपुरीबाईंना पाहुनच सुर्योदय होतो. मग या घटनांना का विसरले जाते.

आज अखंड भारताचा नकाशा दाखवला जातो आणि त्यात अफगाणीस्तान, पाकिस्तान, नेपाळ, म्यानमार, भुटान, श्रीलंका, मालदिव आदी देश दाखवले जातात. अहो या नकाशाचा ऐतिहासिक अभ्यास केला तर हा नकाशाच औरंगजेबच्या काळातला आहे. म्हणूनच त्याला आलमगिर असे म्हटले जात होते. कोणी केले हे देश वेगळे याचे श्रेय खरे तर इंग्रजांना आहे. इंग्रजांविरुध्द का बोंब होत नाही. इंग्रजांनीच सावरकारांना अंदमान-निकोबारच्या तुरूंगात टाकले होते. त्यावेळेस औरंगजेब आला नव्हता. इंग्रजांचे काही कर्ज आहे का आमच्यावर आणि ते कर्ज फेडावे म्हणून त्यांच्याविरुध्द बोलले जात नाही काय? 800 वर्षापुर्वीच्या औरंगजेबची आठवण करून आपल्या कपड्यांवर लागलेले बेरोजगारी, गरीबी, रुपयांची किंमत, भारतावरील कर्ज, भ्रष्टाचार लपविता यावा यासाठीच त्याचा उपयोग होतो. नुसती विष कालवणी करण्यासाठी औरंगजेबच्या नावाचा उपयोग अयोग्यच आहे. औरंगजेबची प्रशंसा करणे भारतीय दंड संहितेत, भारतीय न्याय संहितेत कोणत्या कलमानुसार गुन्हा आहे. याचा शोध आणि बोध वाचकांनी घ्यावा.


सोर्स – अशोक कुमार पांडेय
