नांदेड(प्रतिनिधी)-एकीकडे सर्वसामान्य माणसाला पाणी वाचवा याचे धडे दिले जातात. महानगरपालिका तीन दिवसाला एकदा पिण्याचा पाणी पुरवठा करत आहे. त्यातील अर्धे पाणी फेकण्यात जाते. आजच्या दिवशी विष्णुपूरी प्रकल्पातून बाहेर पाणी पुरवठा करणाऱ्या तीन पाईपलाईन पैकी एका ठिकाणी दोन लिकेज दिसत आहेत. यामधून दर सेकंदाला 50 लिटरपेक्षा जास्त पाणी वाया जात आहे. याकडे कोण पाहणार, या पाणी नासाडीचा जबाबदार कोण हे कोठ ठरवणार असे अनेक प्रश्न समोर आले आहेत.
आज दुपारी 3 वाजेच्यासुमारास विष्णुपूरीकडून नांदेडकडे येत असतांन वास्तव न्युज लाईव्हला तेथून पाणी पुरवठ्यासाठी लावलेल्या तीन मोठ-मोठ्या पाईपलाईनपैकी दोन पाईपलाईनमधून पाणी वाहून जात असल्याचे दिसले. त्या पाईपलाईनवर लिकेज खुप दिवसापासून आहे असे जाणवते कारण पाईपलाईनवर काही कागदाचे पुस्टे ठेवून त्यावर दगड ठेवण्यात आलेले होते. पण कागदाच्या पुस्ट्यांंनी पाण्याच्या पाईपलाईनचे लिकेज थांबणार नाही. याची जाणिव या पाईपलाईनची देखरेख करणाऱ्यांना कळले नाही काय? आज स्वत: पाहिलेल्या परिस्थितीनुसार दर सेकंदाला त्या ठिकाणातून जवळपास 50 लिटरपेक्षा जास्त पाणी वाहुन जात आहे.
वातानुकूलीत कक्षामध्ये बसून जनतेला धडे शिकवणारे प्रशासकीय अधिकारी या संदर्भाने कोणाला जबाबदार धरणार हा प्रश्न आ वासून उभा आहे. जनतेला तिन दिवसाला एकदा पिण्याचे पाणी मिळत आहे. त्यातील अर्धे पाणी फेकून द्यावे लागते कारण ते गढूळ असते. पाण्याची पाणीपट्टी मात्र पूर्ण वर्षाची वसुल केली जाते. आता तर उन्हाळा आहे. अशा छोट्या-छोट्या लिकेजकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे. नाही तरी उन्हाळ्यात पाच ते सात दिवसाला एकदा पाणी मिळते. जनतेला सुध्दा ही सवय झाली आहे. आपल्या पैशांच्या मोबदला असा होत आहे. याकडे जनतेने डोळे वटारूनच पाहिले पाहिजे.
विष्णुपूरीच्या पाईपलाईनमध्ये लिकेज हजारो लिटर पाण्याची नासाडी
