नांदेड(प्रतिनिधी)-सिख समाजाच्या विवाहची नोंदणी आता आनंद विवाह नोंदणी या कायद्यानुसार होणार आहे. या संदर्भाचे आदेश अल्पसंख्याक विभागाचे सचिव रुचेश जयवंशी यांनी जारी केले आहेत.
महाराष्ट्र राज्य पंजाबी साहित्य अकादमी व अल्पसंख्याक विकास विभागाचे कार्याध्यक्ष मलकितसिंह बल यांनी 6 फेबु्रवारी रोजी सचिव रुचेश जयवंशी यांना एक पत्र लिहिले आणि सिख समाजाची विवाह नोंदणी ही हिंदु विवाह नोंदणी नियमाअंतर्गत करू नका कारण महाराष्ट्र आनंद विवाह अधिनियम 1909 व सुधारीत अधिनियम 2012 च्या कलम 6(1) प्रमाणे प्रदान केलेल्या अधिकारात सिख धर्मियांची विवाह नोंदणी होणे आवश्यक आहे. या पत्राला अनुसरुन अल्पसंख्याक विभागाचे सचिव रुचेश जयवंशी यांनी जारी केलेल्या पत्रानुसार सिख धर्मियांची विवाह नोंदणी आनंद विवाह नोंदणी अधिनियमात करण्यासाठी विवाह निबंधक म्हणून अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे. या अधिकाऱ्यांनी या पुढे सिख समुदायांच्या लग्नाची नोंदणी हिंदु विवाह नोंदणी अधिनियमाअंतर्गत न करता ती आनंद विवाह नोंदणी अधिनियमाप्रमाणे करावी. या संदर्भाच्या सुचना राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, विवाह नोंदणीशी संबंधीत सर्व अधिकारी यांना आपल्या स्तरावरून कळवाव्यात असे सांगितले आहे.
सिख समुदायाची विवाह नोंदणी आनंद विवाह नोंदणी अधिनियमाप्रमाणे होणार
