जिल्हा परिषद गृहनिर्माण संस्था मर्यादित विकास नगर कौठा चेअरमनपदी ऊतम वरपडे तर सचिव कुमार लालवाणी बिनविरोध निवड

नवीन नांदेड (प्रतिनिधी):जिल्हा परिषद शिक्षक सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित विकास नगर नवीन कौठा नांदेडचा विशेष सभा  संचालक मंडळाची घेण्यात येऊन अध्यक्षपदी ऊतम वरपडे,तर सचिव कुमार नरेश लालवाणी व‌ कोषाध्यक्षपदी सविता विठ्ठलराव लखमनमवार यांच्यी बिनविरोध निवड निवडणूक अधिकारी संतोष सरकटे यांनी  5 मार्च रोजी घेण्यात आलेल्या बैठकीत केली.
    जिल्हा परिषद शिक्षक सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित विकास नगर कौठा नांदेडचा संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक 16 फेब्रुवारी रोजी पंचवार्षिक निवडणूक घेण्यात आली या निवडणुकीत विकास नगर पॅनलला निवडणूक पुर्व दोन जागा बिनविरोध निवड झाली तर आकरा जागेसाठी विकास नगर पॅनल व प्रगती पॅनल मध्ये अटीतटीच्या निवडणूक होऊन 162 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता जवळपास 75/ टक्के मतदान झाले होते.यात विकास नगर पॅनलला नऊ तर प्रगती पॅनला दोन जागा मिळाल्या होत्या,एकुण आकरा जागा मिळवून निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले होते.
 5 मार्च रोजी निवडणूक अधिकारी संतोष सरकटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेला एकुण 13 संचालक मंडळ उपस्थित होते, यावेळी अध्यक्षपदासाठी ऊतम शंकरराव वरपडे यांच्या नावासाठी सुचक उध्दव बसवदे, अनुमोदक प्रल्हाद घोरपडे,सचिव पदासाठी कुमार नरेश यांना सुचक वेणुगोपाल रामदड तर अनुमोदन रविंद्र पेटलवार यांनी दिले, कोषाध्यक्ष पदासाठी सुचक शोभा शंकरराव पदमवार तर  अनुमोदक बाबाराव ईबितवार यांनी दिले, वरील पदासाठी एकच अर्ज आल्याने निवडणूक अधिकारी संतोष सरकटे यांनी बिनविरोध निवड घोषीत केली , या निवडीचे संचालक मंडळ यांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करून पुष्पहार घालून अभिनंदन केले.यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष ऊतम वरपडे यांनी गृहनिर्माण संस्थेच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!