नांदेड(प्रतिनिधी)-पुण्यातील स्वारगेट येथे जो काही प्रकार झाला तो निषेधार्थ आहे. या घटनेतील आरोपी पोलीसांनी रात्रीचा दिवस करून ताब्यात घेतला आहे. मात्र पोलीस प्रशासनाने कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता काम कराव असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
नांदेड येथे पक्ष प्रवेश सोहळा आणि कार्यकर्ता मेळाव्यासाठी राष्ट्रवादी कॉंगे्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार हे आले असता नांदेडकरांनी त्यांचे जागो जागी जंगी स्वागत केले. ओम गार्ड येथे पक्ष प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी मंत्री नवाब मलीक, आ. विक्रम काळे, आ.सतिश चव्हाण, आ.प्रताप पाटील चिखलीकर, जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी, दिव्यांगचे राज्यप्रभारी रामदास पाटील सोमठाणकर, नांदेड शहर जिल्हाध्यक्ष जीवन पा.घोगरे, शिवाजी होटाळकर, माजी सभापती बाळसाहेब रावणगावकर, चित्राताई वाघ यांच्यासह आदींची यावेळी उपस्थिती होती. यावेळी माजी आ.मोहनअण्णा हंबर्डे यांनी आपल्या समर्थकांसह ना.अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंगे्रस पार्टीत प्रवेश केला. यावेळी गफार खान पठाण, चाबेर चाऊस, वैशाली चव्हाण यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंगे्रसमध्ये प्रवेश केला.
यावेळी ना.अजित पवार बोलत असतांना म्हणाले की, मी राजकारणात 30 वर्षापासून झाल काम करतो. सुरूवातीला 1991 मध्ये पंजा या चिन्हावर लोकसभेची निवडणुक लढवली आणि विजयी झालो. मी आजपर्यंत 8 निवडणुका लढवून विजय मिळवला हा येड्या गबाळ्याच काम नाही. यासाठी काम कराव लागत. नांदेड जिल्ह्यातील गोदावरी नदीवर बाभळी बंधारा उभारण्यासाठी मी पुढकार घेतला. एवढेच नसून तत्कालीन पंतप्रधानांची भेट घेवून हा बाभळी बंधारा उभा केला. याचप्रमाणे या जिल्ह्यात आगामी काळात मोठे उद्योग धंदे आणण्यासाठी आपल्याला काम करायचे आहे.मी नांदेडमध्ये मागील 34 वर्षात अनेकदा आलो. पण आज नांदेडमध्ये कार्यकर्त्यांनी केलेल्या स्वागताने मी अश्चर्यचकीत झालो. चांदा ते बांधा असा पक्ष विस्ताराचा कार्यक्रम हाती घेतला आहे. पक्षाने त्याची विचारधारा अजूनही सोडलेली नाही. हा पक्ष फुले-शाहु-आंबेडकरांच्या विचारधारेवर स्थापन झाला आहे आणि तिच विचारधारा आम्ही स मोर नेत आहोत. पक्षात काम करतांना जुने आणि नवे असा वाद न करता सर्वांना सोबत घेवून काम केल जाईल. ज्यांच्याकडे कर्तुत्व आणि नेतृत्वांचे ज्याच्यामध्ये गुण आहेत. त्यांना पक्षात नक्कीच संधी दिली जाईल. स्व.यशवंतराव चव्हाण यांनी 1962 मध्ये सत्तेचे विकेंद्रीकरण केले. पण फेबु्रवारी 2022 पासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या नाहीत याचे मात्र खेद वाटते. कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही. पण आगामी काही काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागतील यासाठी सर्वांनी कामाला लागावे असा संदेशही त्यांनी दिला.
राज्याच अधिवेशन 3 मार्चपासून सुरू होणार आहे. पहिल्याच दिवशी पुरवणी मागण्या झाल्यानंतर राज्याच्या 13 कोटी जनतेसाठी अर्थसंकल्प सादर करायचा आहे. हा अर्थसंकल्प सादर करतांना समाजातील सर्व घटकांचा विचार करून गरीबांच्या हिताच्या योजना आहेत. त्या योजनेला सरकारची मदत पाहिजे. व समाजाला सक्षम करण्यासाठी अर्थसंकल्प देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. पुण्यातील घटनेबाबत त्यांनी निषेध व्यक्त करत असतांना या घटनेतील आरोपीला सोडले जाणार नाही. जो कोणी या घटनेत नराधम आरोपी असेल त्याला जास्तीत जास्त शिक्षा होण्यासाठी सरकार निश्चितच काम करणार आहे आणि पोलीसांनीही काम करत असतांना कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता काम कराव.
पोलीस प्रशासनाने राजकीय दबावाला बळी न पडता काम कराव-ना.अजित पवार
