नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात जिवघेणा हल्ला या सदरात दोन गुन्हे दाखल
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात 25 फेबु्रवारी रोजी झालेल्या जिवे मारण्याचा प्रयत्न हा गुन्हा 27 फेबु्रवारी रोजी दाखल झाला. त्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या एका व्यक्ती पकडतांना त्याने पोलीसांना जिवेमारण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलीसांनी त्याच्यावर गोळ्या झाडून त्याला जखमी केले. सध्या त्यावर उपचार सुरू आहे.
27 फेबु्रवारी रोजी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात जिवे मारण्याचा प्रयत्न या सदराखाली दोन गुन्हे दाखल झाले. त्या मध्ये पहिल्या गुन्ह्यातील तक्रारदार कृष्णसिंग बलबिदसिंग बावरी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 25 फेबु्रवारी रोजी सायंकाळी 25 वाजता एनडी 41 दत्तनगर सिडको येथे भैया मिरासे, दिग्विजय नागोगुडे, सुरज देसाई, गणेश भुजंग मोरे, साईलिला, बॉबी मुनेश्र्वर, अनिल पंजाबी, संघरत्न वाघमारे उर्फ डोरेमॅन यांनी बेकायदेशीर मंडळी जमवून कृष्णसिंग बावरीच्या भावाने भैय्या मिरासेच्या विरुध्द दिलेल्या तक्रारीचा राग मनात धरुन त्यावर तलवारीने हल्ला केला. ती त्यांनी हुकवली पण तलवार पाठीवर लागली त्यामुळे ते जखमी झाले. या तक्रारीवरुन नांदेड ग्रामीण पोलीसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 109, 189, 189(3) 189(4), 190, 115(2) आणि 351(3) प्रमाणे 8 जणांविरुध्द गुन्हा क्रमांक 192/2025 दाखल केला. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक मंठे हे करीत आहेत.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा 27 फेबु्रवारीच्या मध्यरात्री 2.40 वाजता घडला. त्यातील तक्रारदार सोनखेडचे सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग व्यंकटी माने हे आहेत. त्यांच्या तक्रारीनुसार कृष्णसिंग बावरीवर 25 फेबु्रवारी रोजी हल्ला करणारा अविनाश उर्फ भैया माधवराव मिरासे (28) हा युवक गणेश विसर्जन खदानीजवळ असल्याची गोपनिय माहिती त्यांना समजल्यावर वरिष्ठांच्या आदेशाने सोनखेड आणि स्थानिक गुन्हा शाखेचे पथक त्याला पकडण्यासाठीचे शासकीय काम करण्याकरीता गेेले असता. तेथे दोन आरोपी होते. आम्ही त्यांना पोलीस आहोत असे सांगितले आणि थांबून राहण्यास सांगितले परंतू त्यातील एक पळून गेला. तेंव्हा न प ळालेला आरोपी अविनाश उर्फ भैय्या मिरासे याने तुम्ही माझे काही वाकडे करू शकत नाही मी तुम्हाला जिवंत सोडणार नाही म्हणून आपल्याकडील गावठी कट्याने पोलीस पथकाकडे गोळी झाडली. पोलीसांनी प्रसंगावधान ओळखून स्वरक्षणार्थ स्वत:कडील पिस्टलने दोन गोळ्या झाडल्या त्यामुळे अविनाश मिरासे त्याच्या उजव्या पायाला गोळी घालून तो जखमी झाला. त्यास स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरिक्षक साईनाथ पुयड यांनी दवाखान्यात उपचारकामी दाखल केले. अशा प्रकारे शासकीय कामात अडथळा निर्माण करून अविनाश उर्फ भैया मिरासेने पोलीसांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी या तक्रारीनुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम 109, 132, 262 आणि 3/25 भारतीय हत्यार कायदा प्रमाणे अविनाश मिरासे विरुध्द गुन्हा क्रमांक 184/2025 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक कांबळे यांच्याकडे देण्यात आला आहे.
पोलीसांनी गुन्हेगारावर गोळीबार करून पकडले
