एकनाथ शिंदे यांचे मला हलक्यात घेवू नका हे वाक्य भाजपच्या वर्मी लागले

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला हलक्यात घेवू नका मी टांगा उलटवण्याची ताकत ठेवतो. अशा शब्दात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आभार यात्रेत बोलतांना आपल्या भावना व्यक्त केल्या. खरे तर हलक्यात घेवू नका हे शब्द भारतीय जनता पार्टीसाठी आहेत आणि त्याचा प्रभाव दिसला. धावपळ करत केंद्रीय गृहमंत्री महाराष्ट्रात आले आणि त्यांनी व्यासपीठावरून सरकारचा टांगा सुरक्षीत ठेवा अशा शब्दात एकनाथ शिंदे यांना झापले. त्या व्यासपीठावरून एकनाथ शिंदे अचानकच उठून निघून गेले. त्यांच्या खुर्चीवर दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार पटकन बसले याचा अर्थ तीन टायरच्या महाराष्ट्र सरकारमध्ये सर्व काही ठिक आहे असे म्हणता येणार नाही. या राजकीय भुकंपाचा परिणाम काय होईल येणाऱ्या काळात पाहायला मिळेल.

Oplus_131072

2024 ची विधानसभा निवडणुक जिंकल्यानंतर आलेल्या आकड्यांच्या स्वरुपात एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पद मिळाले. उपमुख्यमंत्री पद मिळाले तरी एकनाथ शिंदे आजही मुख्यमंत्र्यांच्या तोऱ्यातच वागतात. त्यांनी अनेकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या बैठकीला हजर न राहता. त्याच विषयासाठी दुसरी बैठक बोलावल्याची अनेक उदाहरणे आहेत. फक्त देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत त्यांचे जमत नाही असे नव्हे तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत सुध्दा त्यांची सध्या कट्टी झालेली दिसते. एकनाथ शिंदे यांच्या गटाचे सात खासदार आहेत. केंद्र सरकारला त्यांची सुध्दा गरज आहेच. कारण केंद्र सरकारकडे आवश्यक खासदारांचे संख्याबळ उपलब्ध नाही. दरम्यान निवडणुक विजयानंतर आभार यात्रा काढत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जवळपास सर्वच व्यासपीठावरून मला हलक्यात घेवू नका मी टांगा उलथवून टाकण्याची ताकत ठेवतो असे शब्द बोलले. त्यावेळी मात्र सर्वांच्या लक्षात हे वाक्य चांगल्या पध्दतीने आले नाही.
पुढे देवेंद्र फडणवीस यांनी 1310 एस.टी.बसेस खरेदी करण्याच्या कराराला स्थगिती दिली आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतांना सुरू केलेला 900 कोटी रुपयंाचा जालना हाऊसिंग प्रकल्पबाबत सिडको कडून अहवाल मागविण्यात आला आहे. त्याची चौकशी सुरू झाली आहे. खरे तर हा प्रकल्प 2020 मध्ये सुध्दा रद्द करण्यात आला होता. तेंव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. म्हणजे त्यावेळेस घेतलेल्या निर्णयात देवेंद्र फडणवीस यांचा सहभाग होताच. मुंबई येथील झोपडपट्टीमध्ये भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बीएमसीची 1400 कोेटी रुपयांची निविदा रद्द करण्यात आली आहे. आधारभुत मुल्यांवर पीक खरेदी करण्यासाठी नाफेडच्यावतीने काही संस्थांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आणि शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांच्या शिफारशीवरुन त्या संस्थांची नियुक्ती करण्यात आली होती. मुख्यमंत्री सहाय्यता निधी प्रमाणे एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री सहाय्यता निधी हे नवीन विभाग सुरू केले आहेत. म्हणजेच ते उपमुख्यमंत्री असतांना मुख्यमंत्र्यांसारखेच वागत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी ओएसडी आणि पीए नियुक्तीला सुध्दा स्थगिती दिली आहे. तसेच दोघांमध्ये पालकमंत्र्यांच्या नियुक्तीवरुन सुध्दा खटपट झालेली आहे. कारण एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटाचा एकही नेता पालकमंत्री नाही. तसेच एकनाथ शिंदे यांच्या कामांची चौकशी करण्यासाठी समिती सुध्दा स्थापित करण्यात आली आहे.
सध्याच्या परिस्थितीत असेही दिसते की, दिल्लीमध्ये झालेल्या मराठी साहित्य संमेलनात नरेंद्र मोदी आणि शरद पवार हे दोघे उपस्थित होते. आपल्या भाषणांमध्ये नरेंद्र मोदी यांनी अनेकदा शरद पवार यांना भटकती आत्मा असा उल्लेख करून टोमणे मारले होते. पण मराठी साहित्य संमेलनात शरद पवारांसमोर दाखवलेल्या सेवाभावाच्या फोटो मात्र मिडियामध्ये छापून आणल्या. त्यामुळे सुध्दा एकनाथ शिंदे यांना भिती वाटत असेल की, शरद पवार माझा गेम करतील आणि म्हणूनच त्यांनी मला हलक्यात घेवू नका या वाक्याला जरा जोरदारपणे बोलायला सुरूवात केली. याला गंभीरतेने घेत धावपळ करत केंद्रीय गृहमंत्री महाराष्ट्रात आले आणि त्यांनी एकनाथ शिंदे यांना चांगलेच झापले. त्यानंतर एकनाथ शिंदे व्यासपीठावरून उठून निघून गेले. रिकाम्या झालेल्या खुर्चीवर लगेच दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार हे येवून बसले. त्यावेळी अमित शाह सुध्दा त्यांच्याकडे आश्चर्याने पाहत होते. स्वत: भाषण करतांना अमित शाह म्हणाले देवेंद्र फडणवीसचा मला फोन आला आणि माझ्या अंगावर रोमांच आले. पण नंतर स्वत:ला सांभाळून अमित शाह यांनी सांगितले की, 20 लाख लोकांना घरे वाटायचे आहेत. हे ऐकल्यावर मला रोमांच उभे राहिले. कोणत्या कारणामुळे ते रोमांच उभे राहिले, का टेन्शन आले अमित शाह यांना आणि का महाराष्ट्राचा दौरा केला हे वाचकांना सुध्दा कळते. शिंदे विरुध्द फडणवीस आणि शिंदे विरुध्द फडणवीस आणि अजित पवार अशी परिस्थिती महाराष्ट्रात तयार झाली आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतांना त्यांच्या निर्णयात देवेंद्र फडणवीस सहभागी होतेच पण आता त्यांना एकनाथ शिंदेंची भिती वाटत नाही. कारण महाराष्ट्रात 188 जागांमध्ये 145 हा आकडा बहुमताचा आहे. त्यात भाजपचे 103 आहेत. शिवसेना शिंदे गटाचे 37 आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 39 आहेत आणि इतर 22 जण सरकारला पाठींबा देत आहेत. म्हणून 201 चा आकडा भारतीय जनता पार्टीकडे आहे. म्हणून त्यांना शिंदेची भिती वाटणे बंद झाले आहे.


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुध्दा कळले आहे की, माझा भरपूर उपयोग भारतीय जनता पार्टीने केला आहे. आपल्या वाक्याबद्दल चर्चा सुरू झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी हा माझा जुनाच जुमला आहे असे सांगून वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न सुध्दा सुरू केला आहे. खासदारांच्या संख्येत शिंदे गटाकडे 7 आणि शरद पवार गटाकडे 8 खासदार आहेत. म्हणून मोदीला आज शरद पवार जवळचे वाटत असेल कारण त्यांची केंद्रात परिस्थिती चांगली नाही. परंतू एकनाथ शिंदे सुध्दा संघर्षरत नेता आहे. ते आपला संघर्ष सुरु ठेवतील. परंतू सध्या उपमुख्यमंत्री असतांना सुध्दा पद मोठे दिसत असले तरी त्या पदाची उंची मात्र खाली घसरली आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!