नांदेड(प्रतिनिधी)-लहान बालकांनी आपल्या पालकांच्या मोबाईलमध्ये जास्त डोकाऊ नये कारण त्यातून वेगवेगळ्या संकेतस्थळांना पाहत असतांना आपराधास बळी पडण्याचा प्रकार घडतो असे प्रतिपादन पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांनी केले.
दि.20 फेबु्रवारी रोजी नांदेड शहरातील शाळकरी विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम आणि सायबर गुन्ह्या संदर्भात मार्गदर्शन करतांना शहाजी उमाप बोलत होते. बालकांना वाहतुकीच्या नियमांची पुर्ण माहिती नसल्यामुळे सुध्दा अनेकदा मुले घराबाहेर असतांना पालकांची ती चिंता असते. त्यासाठी आपल्या पाल्यांना वाहतुकीच्या नियमांची शिकवण पालकांनी द्यावी त्यासाठी पोलीस विभागातर्फे सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. आपल्या पालकांच्या मोबाईलमध्ये डोकावतांना बालकांना विविध संकेतस्थळ दिसतात. ते पाहण्याची उत्सुकता बालकांमध्ये तयार होते आणि त्यातूनच अनेक लोक अपराधांचे बळी ठरतात असे शहाजी उमाप म्हणाले. तेंव्हा बालकांनी पालकांच्या मोबाईलमध्ये डोकावण्याची प्रवृत्ती कमी करावी असे शहाजी उमाप यांनी सांगितले.
रहदारीचे नियम आणि सायबर सुरक्षा या मुलांसाठी महत्वाच्या आहेत. म्हणून शहाजी उमाप यांच्या नेतृत्वात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, वाहतुक शाखेचे पोलीस निरिक्षक एस.एल.गुट्टे, पोलीस उपनिरिक्षक कोटतिर्थवाले यांनी सुध्दा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शहरातील ऑक्सफर्ड इंटरनॅशन स्कुलचे 150 विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी उपस्थितीत विद्यार्थ्यांना पोलीस विभाग वापरतात ते शस्त्र दाखवून त्याची माहिती देण्यात आली.