गुरुद्वारा चौरस्तावरील लोखंडी पादचारी पुल हटवा ;कुंजीवाले व संधू यांची मागणी

 

नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील सचखंड गुरुद्वारा चौकामध्ये महानगरपालिका च्या वतीने 2008 साली लोखंडी पादचारी पुल उभा करण्यात आला होता. मात्र त्याच्या वापर होत नसल्याने या पुलामुळे कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी सदर फुल हटवून मार्ग मोकळा करावा अशी मागणी अल्पसंख्याक विकास विभाग महाराष्ट्र राज्याचे सदस्य स. अमरजीत सिंग कुंजीवाले व मराठवाडा विभाग प्रमुख अल्पसंख्याक मोर्चा भाजपा महाराष्ट्र सदस्य गुरुदीप सिंग संधू यांनी केली आहे.

गुरुता गद्दी सोहळा 2008 करिता यात्रेकरूच्या सोयीसाठी प्राचार्य लोखंडी पूल उभारण्यात आला होता या पुलाच्या अपेक्षित वापर होत नसल्याने सदर पुलाच्या वर्षभर कोणीही वापर करत नसल्याने हा पुल नाहक भुर्दंड झाल्याचे लक्षात येत आहे. परंतु शीख धर्माकडून होला मोहल्ला,वैशाखी, दशहरा दिवाली, कार्यक्रमादरम्यान या पुलावर भाविकांची मोठी गर्दी कार्यक्रम पाहण्यासाठी होत असते यादरम्यान एखादी दुर्घटना घडवून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गुजरात येथील मोरोंबी पूल कोसळून 30 ऑक्टोबर 2022 रोजी मोठी दुर्घटना घडून 140 जणांच्या जीवितहानी झाली होती. येणाऱ्या 14 मार्च रोजी प्रसिद्ध होला मोहलांचा कार्यक्रम आहे. यामध्ये कोणतेही दुर्घटना घडू नये. त्यामुळे सदर पुलाची कोणतीही आवश्यकता नसल्याने सदर लोखंडी पादचारी पुल पूर्णपणे हटवून माग मोकळा करावा अशी मागणी कुंजीवाले व संधू यांनी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना भेटून निवेदन दिले. त्यांच्यासोबत एड. सुरेंद्र सिंग लोणी वाले हरप्रीत सिंग मेजर भाजपाचे गुरुप्रीत सिंग सोखी व हरप्रीत सिंग पुजारी यांच्या पण स्वाक्षऱ्या आहे. या निवेदन ची प्रत माननीय मुख्यमंत्री .  सार्वजनिक बांधकाम मंत्री . जिल्हाधिकारी  नांदेड व मनपा आयुक्त  यांना देण्यात आली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!