नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील पारसनगर भागातील बालाजी मंदिराजवळ दोन भावांनी मिळून एका 25 वर्षीय व्यक्तीला जिवे मारण्याचा प्रयत्न केला आहे.
राहुल गणेश शिवभक्ते यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.16 फेबु्रवारी रोजी दुपारी 3 ते 4 या वेळेदरम्यान पारसनगर येथील बालाजी मंदिराजवळ त्यांना राहुल बाबुराव सुर्यवंशी (36) आणि राजकुमार बाबुराव सुर्यवंशी (39) दोघे रा.लालवाडी हे भेटले आणि जुन्या भांडणाच्या कारणावरून राहुल शिवभक्तेच्या छातीवर, डाव्या बगलेत, गळ्याजवळ खंजीरने सपासप सार करून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला. शिवाजीनगर पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 60/2025 नुसार दाखल केली आहे. पोलीस उपनिरिक्षक किशोर गावंडे अधिक तपास करीत आहेत.
शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका युवकाच्या हत्त्येचा प्रयत्न
