नांदेड(प्रतिनिधी)-भिमाईनगर हदगाव येथे आपसातील भांडणाच्या कारणावरून तिन जणांनी एका महिलेचे घरफोडून त्यातून घरगुती सामान किंमत 50 हजार रुपयांचे चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे.
वैशाली चंद्रशेखर नरवाडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 14 फेबु्रवारी रोजी सकाळी 7 वाजता त्यांच्या घराच्या शेजारी राहणारे यादव सावते यांनी दिलेल्या माहितीनुसार काही व्यक्तींनी तुमच्या घराचे कुलूप तोडून सामान चोरून नेले आहे. विचारणा केली असता चोरट्यांनी त्यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली आहे. वैशाली आणि त्यांचे पती चंद्रशेखर यांनी घरी जाऊन पाहणी केली असता घराच्या दरवाज्याचे कुलूप तोडलेले होते. लग्नात दिलेले घरगुती साहित्य 50 हजार रुपये किंमतीचे राजू गणपत नरवाडे, साईनाथ राजू नरवाडे आणि वेदांत राजू नरवाडे सर्व रा.पतरचाळ यांनी जुन्या वादाच्या कारणावरून हे साहित्य चोरून नेले आहे. हदगाव पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 36/2025 दाखल केला आहे. पोलीस अंमलदार पांढरे अधिक तपास करीत आहेत.
भिमाईनगर हदगाव येथे 50 हजारांची चोरी
