नांदेड(प्रतिनिधी)-भोकर येथे एका महिलेचा तिच्या नवऱ्याने शेतात केलेल्या कामाचे पैसे का आणले नाही म्हणून खून केला आहे.
अजय उर्फ माधव काशीनाथ सुर्यवंशी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.13 फेबु्रवारी रोजी रात्री 8.30 ते 9 वाजेदरम्यान चिखलवाडी भोकर येथे संगिता काशिनाथ सुर्यवंशी (40) यांना तिचा नवरा काशिनाथ संभाजी सुर्यवंशी (45)याने तु शेताच्या कामाला गेली होतीस मग तेथून पैसे आणून मला का दिले नाहीस या कारणासाठी तिला थापड बुक्यांनी तोंडावर आणि पोटात जोरदार लाथा मारून तिचा खून केला आहे. भोकर पोलीसांनी या संदर्भाने गुन्हा क्रमांक 73/2025 दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरिक्षक कुंभार हे करणार आहेत.
शेतातील कामाचे पैसे का आणले नाही म्हणून नवऱ्याने पत्नीचा खून केला
