मंगल कार्यालयात महिलेचे दागिणे आणि रोख रक्कम चोरली

नांदेड(प्रतिनिधी)-एका मंगल कार्यालयात एका महिलेच्या पर्समधील 1 लाख 18 हजार 487 रुपयंाचा ऐवज चोरट्यांनी लांबला आहे.
अविनाश श्रावण सुर्यवंशी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 9 फेबु्रवारी2025 रोजी सायंकाळी 4 ते 5 वाजेदरम्यान पिंपळगाव येथील विठ्ठलराव देशमुख मंगल कार्यालयात गर्दीचा फायदा घेवून काही चोरट्यांनी त्यांच्या आईच्या पर्समधील 10 हजार रुपये रोख रक्कम आणि 1 लाख 8 हजार 487 रुपयांचे दागिणे असा एकूण 1 लाख 18 हजार 487 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. अर्धापूर पोलीसांनी या संदर्भाने गुन्हा क्रमांक 102/2025 दाखल केला आहे. गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक कऱ्हाळे हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!