२४ लाख ६९ हजारांची फसवणूक

नांदेड(प्रतिनिधी)-रिलीश मल्टीसॉसेस एलएलपी कंपनीच्या नावावर मोठा परतावा मिळणार आहे म्हणून २४ लाख ६९ हजार ५२१ रुपयांची फसवणूक करणार्‍या एकाविरुध्द इतवारा पोलिसांनी भारतीय दंड संहितेनुसार गुन्हा दाखल केला आहे.
सय्यद दायमी लुकमान गुलाम रब्बानी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ९ जानेवारी २०२१ ते २० मार्च २०२४ दरम्यान मका मस्जिद जवळ अहमदपूर येथील शेख अब्दुल माजीद शेख अब्दुल गफार (४२) रा.अहमदपूर जि.लातूर या व्यक्तीने त्यांच्याकडून कमी वेळात जास्तीचा परतावा देण्याचे आमिष दाखवून ३० लाख ७० हजार ५२० रुपये घेतले. त्यापैकी ६ लाख ९२९ रुपये परत दिले. परंतु शिल्लक राहिलेले पैसे दिले नाही. पैसे मागितले तेंव्हा जिवे मारण्याची धमकी दिली. एकूण २४ लाख ६९ हजार ५२१ रुपयांची फसवणूक झाली आहे. इतवारा पोलिसांनी या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम ४०६,४२० आणि ५०६ नुसार गुन्हा क्र.६४/२०२५ दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक पवार यांच्याकडे देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!