नांदेड (प्रतिनिधी)-दि.३१ जानेवारी रोजी सकाळी ९.४० वाजता दातार चौक या भागातून बालाजी धोंडीबा मच्छरलावार हे ६५ वर्षीय ज्येष्ठ नागरिक जात असताना दुचाकीवर आलेल्या दोन भामट्यांनी त्यांना आम्ही पोलीस आहोत, असे बनावट ओळखपत्र दाखविले आणि त्यांच्या गळ्यात असलेले लॉकेट व सोन्याची अंगठी काढायला लावली. आणि ते १ लाख ५ हजार रुपयांचे साहित्य एका कागदाच्या पुडीत बांधून त्यांना परत दिले. बालाजी मच्छरलावार यांनी ती कागदाची पुडी उघडून पाहिली असता ज्यात फक्त खडे होते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे तक्रार दिली. शिवाजीनगर पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा क्र.३५/२०२५ दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक जालिंदर तांदळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक किशोर गावंडे अधिक तपास करीत आहेत.
More Related Articles
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. मच्छिद्रनाथ तांबे, प्रा. डॉ. गोविंद काळे व डॉ. मारुती शिकारे यांचा दौरा
नांदेड– महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. मच्छिद्रनाथ तांबे, प्रा. डॉ. गोविंद काळे व…
पोलीस अंमलदार तानाजी येळगेसह तीन पोलीस माहूरच्या मालकाच्या सेवेत
नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेतील काम बदली झालेल्या काही लोकांशिवाय चालूच शकत नाही अशा आशयाच्या बातम्या वास्तव…
मरणोत्तर देहदानामुळे आपला देह इतरांच्या कामी येतो-माधव आटकोरे
नांदेड -अवयवदान हे श्रेष्ठ दान असून मरणोत्तर देहदानामुळे आपला देह इतरांच्या कामी येतो.तसेच पर्यावरण संवर्धनासाठी…
