नांदेड :- संचालनालय, लेखा व कोषागारे, कर्मचारी कल्याण समितीकडून विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा-2025 चे आयोजन करण्यात आले होते. त्याकरिता कोषागारे कर्मचारी नांदेड यांना पोलिस कॉन्स्टेबल सदानंद सपकाळे यांनी सलामी व पथसंचलन यांचे प्रशिक्षण देऊन तयार केले. कोषागारे कर्मचारी यांनी सुंदर असे सलामी व पथसंचलन केले आणि विभागीय क्रीडा स्पर्धामध्ये प्रथम पारितोषक आणले आहे. त्याबद्दल नांदेड पोलिस दलात कार्य करणारे पोलिस कर्मचारी सदानंद सपकाळे यांना जिल्हा कोषागार अधिकारी नांदेड अलंकृताल कश्यप बगाटे , बालाजी देशमाने, अध्यक्ष कर्मचारी संघटना नांदेड यांनी पुष्प आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचा कार्याचा गौरव केला व पुढील कार्यास शभेच्छा दिल्या.
More Related Articles
श्री क्षेत्र माळेगाव यात्रेला उद्यापासून प्रारंभ; देवस्वारी-पालखी पूजन
नांदेड – दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र माळेगाव येथील श्री खंडोबाच्या यात्रेला आजपासून देवस्वारी…
गुरुजी चौकात १ लाख ५४ हजारांची चोरी
नांदेड (प्रतिनिधी)-गुरुजी चौक, पावडेवाडी भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीची घटना घडली असून चोरट्यांनी घरातून तब्बल १…
दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांकडून 1 लाख 30 हजारांचा मुद्देमाल पकडला
नांदेड(प्रतिनिधी)-विमानतळ पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना पकडून त्यांच्याकडून चोरी प्रकरणातील 70 हजार…
