नांदेड(प्रतिनिधी)-काल रात्रीपासून लेबर कॉलनी भागात पिसाळलेल्या कुत्राने जवळपास 14 ते 15 जणांना चावा घेतला असून त्यात एका बालकाचा सुध्दा समावेश आहे. आता वृत्तलिहिपर्यंत तरी तो कुत्रा महानगरपालिकेने पकडलेला नाही अशी माहिती लेबर कॉलनीमधील नागरीकांनी दिली आहे.
कुत्रे माणसांवर हल्ला करतात या घटना काही नवीन नाहीत. माणसांनी त्यापासून सुरक्षा बाळगावी, एकटे जातांना आणि निर्जनस्थळी असतांना हातात एखादी काठी असावी असे बरेच जण बोलतात, वागतात आणि करतात सुध्दा. पण काल रात्रीपासून लेबर कॉलनी भागातील जवळपास 14 ते 15 जणांना एका पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला आणि त्यात एका लहान बालकाचा सुध्दा समावेश आहे. लेबर कॉलनीमधील नागरीक सांगतात. महानगरपालिकेला या बद्दल सुध्दा देण्यात आली होती. परंतू आज 31 जानेवारी रोजी आम्ही वृत्तप्रसारीत करेपर्यंत तरी त्या कुत्राला महानगरपालिकेने पकडले नव्हते अशी माहिती लेबर कॉलनीतील नागरीक सांगत होते. कुत्र्याने चावा घेतलेले बरेच जण शासकीय रुग्णालय विष्णुपूरी येथे उपचार घेत आहेत.
डॉ.आंबेडकरनगरमध्ये सुध्दा मोकाट कुत्र्यांचा मोठा सुळसुळाट झाला आहे. त्या ठिकाणी आताच काही दिवसांपुर्वी आपल्या पिलांना जन्म दिलेल्या एका कुत्रीने अनेक जणांना चावा घेतला आहे. याचाही बंदोबस्त होण्याची मागणी डॉ.अंाबेडकरनगर येथील नागरीक करत आहेत.

