नांदेड -76 व्या प्रजासत्ताक दिना निमित्त जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांचे हस्ते मुख्य ध्वजारोहण घेण्यात आले व शासनाचा जिल्हा क्रीडा गुणवंत मार्गदर्शक व गुणवंत खेळाडू असे मागील चार वर्षांचे पुरस्कार देण्यात आले. या प्रसंगी माजी मुख्यमंत्री तथा खा. अशोक चव्हाण, खा.अजित गोपछडे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत व जिल्हा क्रीडा आधिकारी जयकुमार टेंभरे हे उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांचे हस्ते किरण स्पोर्ट्स असोसिएशनचे चार खेळाडू सौख्या स्वप्ना घेवारे सन 2022-23, आकांक्षा मारोती सोनकांबळे सन 2021-22, अंजली अशोक भालेराव सन 2020-21, आकाश मरोती बगाटे सन 2020-21 व तसेच नांदेड जिल्हा हौशी जिम्नॅस्टिक्स असो. चे कैवल्य कैलासराव पुजारी यांना गुणवंत खेळाडू पुरस्कार 2023-24 चा प्रदान करण्यात आला व डॉ.अनिल सुरेन्द्र पाटील यांना 2022-23 व सुशील गणेशराव कुरुडे यांना सन 2021-22 चा जिल्हा क्रीडा गुणवंत मार्गदर्शक पुरस्कार देण्यात आला.
सदरील खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन लक्ष्मण फुलारी, संतोष प्रधान, रोहन गायकवाड, सुनील प्रधान, प्रतीक पाटील, अमोल कांबळे व पुजा फुलारी यांनी केले आहे. सदरील खेळाडूंवर जिल्हा क्रीडा कार्यालय व विविध संघटना तसेच क्रीडा प्रेमींकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे व पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन मिळत आहे.
