नांदेड(प्रतिनिधी)-12 जानेवारी रोजी रात्री पार्डी ता.लोहा येथील एका धाब्यासमोरून ट्रकमधील 12 टन 700 किलो तुरडाळ त्या ट्रकच्या चालकासह इतर दोघांनी दुसऱ्या गाडीत टाकून चोरुन नेल्याचा गुन्हा घडला आहे. यातील चालक अटक झाला आहे. इतर आरोपींचा शोध सुरू आहे. सुखदेवसिंग दलबिरसिंग बुटर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची एम.एच.40 सी.डी. 3138 क्रमांकाची 14 टायरची गाडी आहे. या गाडीमध्ये 11 जानेवारी रोजी युनायटेड ट्रान्सपोर्ट बिजापुर कर्नाटक येथून चालक अरविंद गायकवाडने 30 टन 460 किलो तुरदाळ भरली आणि तो नांदेडकडे निघाला. त्याने सुखदेवसिंग बुटरचा फोन 12 जानेवारी आणि 13 जानेवारी रोजी उचलला नाही. त्यानंतर रात्री 9 वाजता ट्रक चालकाने फोन केला आणि सांगितले की, मी आर्णी येथे आहे आणि पुढे जात आहे. 15 जानेवारी रोजी त्याने मला सांगितले की, मी रात्रीच रायपूर येथे पोहचलो आहे पण मी झोपल्यानंतर 150 कट्टे तुर चोरीला गेली आहे. त्यानंतर मी जाऊन अरविंद गायकवाडला आणले आणि त्याने सांगितले की, 12 जानेवारी रोजी रात्री 9 ते 11 यावेळेदरम्यान साईकृपा धाबा पार्डी ता.लोहा येथे अरविंद गायकवाड आणि पाथरड ता.हदगाव येथील सोमेश्वर प्रकाश कंठाळे, परमेश्र्वर गुदमंठवाड या तिघांनी मिळून गाडी क्रमंाक एम.एच.26 सी.एच.0449 यामध्ये 12 टन 700 किलो तुरदाळ चोरीने भरून इतरत्र विक्री केली आहे. या चोरीला गेलेल्या तुरदाळभची किंमत 10 लाख 16 हजार रुपये आहे. या प्रकरणी लोहा पोलीसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 303(2), 306, 3(5) प्रमाणे गुन्हा क्रमांक 26/2025 दाखल केला आहे. या बाबत तक्रार सुखदेवसिंग बुटर सांगतात चालक अरविंद गायकवाडला मीच पकडून दिले होते. पण अद्याप इतर आरोपींना पकडण्यात आलेले नाही. Kanthak Suryatal Post Views: 1,096 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation अनेक प्रसार माध्यमांनी नरेंद्र मोदींच्या बुटाखाली आपली नैतिकता घासली आणि आदीवासी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मूंचे अवमुल्यन केले ग्राहक तक्रार निवारण आयोगाने फ्लिपकार्ड कंपनीच्या विरुध्द दिला आदेश