महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती सी.पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत दीक्षान्त समारंभ पार पडणार
नांदेड -स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा सत्ताविसावा दीक्षान्त समारंभ दि. २९ जानेवारी रोजी सकाळी ११:०० वा. विद्यापीठाच्या दीक्षान्त मंचावर पार पडणार आहे, महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती महोदय सा. सी.पी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ होणार आहे. तसेच महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा बंद्रकांत दादा पाटील हे दीक्षान्त समारंभाचे सन्माननीय अतिथी राहणार आहेत. नवी दिल्ली येथील विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी उपाध्यक्ष व पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे प्रख्यात प्रा. मा. भूषण पटवर्धन हे सन्माननीय प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, व्यवस्थापन परिषदचे सर्व सदस्य यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती असणार आहे. असे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. डी.डी. पवार आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हुशारसिंग साबळे यांनी कळविले आहे.
विद्यापीठातून सर्वाधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यास नांदेड चान्सलर सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात येत असते. यावधी हा बहुमान परभणी येथील बी रघुनाथ आर्टस, कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालयाची विद्यार्थीनी कु श्रद्धा हरहरे यांना मिळणार आहे. कु श्राध्दा हरहरे यांना राज्यपाल महोदयांच्या हस्ते सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. याशिवाय इतरही ५१ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक देवून सन्मानित करण्यात येणार आहे. सत्ताविसाव्या दीक्षान्त समारंभानिमित्त विद्यापीठ परीक्षेत्रातील चारही जिल्ह्यातील एकूण २१०५५ विद्यार्थ्यांना यावर्षी पदवी, पदविका प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. यामध्ये १८० विद्यार्थ्यांना विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी प्रमाणपत्र दीक्षान्त समारंभाच्या दुपारच्या सत्रात मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे.
विद्यापीठातील सर्व संकुलातील विद्यार्थ्यांनी, विद्यापीठ उपकेंद्र लातूर संकुलातील विद्यार्थ्यांनी व न्यू मॉडेल डिग्री कॉलेज हिंगोली येथील ज्या विद्यार्थ्यांनी सत्ताविसाव्या दीक्षान्त समारंभासाठी उपस्थित राहून पदवी, पदविका घेण्यासाठी अर्ज सादर केले आहेत. अशा विद्यार्थ्यांना विद्यापीठातील दीक्षान्त कक्ष विभागातून सकाळी ०८ ते १०:३० वा. दरम्यान पदवी प्रमाणपत्र वितरित केलेले जाणार आहेत. यावेळी दीक्षान्त मंडपात उपस्थित राहण्यासाठी विद्यार्थ्यांना विद्याशाखानिहाय ठरविण्यात आलेले उपरणे लेखा विभागातुन घेणे आवश्यक आहे. त्यासाठी अनामत रक्कम लेखा विभागामध्ये जमा करावे लागणार आहे. त्यानंतरच संबंधितांना दीक्षान्त समारंभाच्या वेळेपुरते परिधान करण्यासाठी उपरणे दिले जाणार आहेत, दीक्षान्त समारंभ संपल्यानंतर उपरण्यासाठी जमा केलेली अनामत रक्कम पैकी उपरणे शुल्का पोटी रु. १०/- बजा करून उर्वरित शुल्क रक्कम परत करण्यात येणार आहे. यासाठी पदवी प्राप्त विद्यार्थ्यांनी पदवी प्रमाणपत्रासाठी भरलेल्या शुल्काची मूळ पावती व स्वतः चे ओळखपत्र सोचत ठेवणे आवश्यक आहे या दीक्षान्त समारंभामध्ये पदवी, पदविका गृहन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी पांढरा पायजमा, पैट व पांढरा बुशशर्ट आणि विद्यार्थिनींनी पांढरी साडी व पांढरा ब्लाउज किंवा पांढऱ्या रंगाच्या ओढनिसह पांढरा पंजाबी ड्रेस परिधान करावा,ज्या विद्यार्थ्यांनी आप-आपल्या महाविद्यालयामध्ये पदवी प्रमाणपत्रासाठी अर्ज केले आहेत अशा विद्यार्थ्यांना विद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ पार पडल्यानंतर महाविद्यालयाने आयोजित केलेल्या पदवी वितरण कार्यक्रमाध्ये पदवी प्रमाणपत्र वितरीत करण्यात येणार आहेत.