नांदेड(प्रतिनिधी)-डॉ.आंबेडकरनगर येथील ज्येष्ठ उपासक सुधाकर भिमराव गायकवाड यांचे आज निधन झाले आहे. त्यांची अंत्ययात्रा सायंकाळी 5 वाजता त्यांच्या राहत्या घरून निघेल आणि शांतीधाम स्मशानभुमी येथे त्यांना अंतिम निरोप देण्यात येईल.
डॉ.आंबेडकरनगर येथील ज्येष्ठ उपासक सुधाकर भिमराव गायकवाड (68) यांचे आज निधन झाले आहे. त्यांची अंतिमयात्रा 25 जानेवारी 2025 रोजी अर्थात आज शनिवारी सायंकाळी 5 वाजता त्यांच्या राहत्या घरापासून निघणार आहे. त्यांना शांतीधाम स्मशानभुमीत अंतिम निरोप दिला जाणार आहे. सुधाकर गायकवाड यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य अजय उर्फ बंटी गायकवाड यांचे ते वडील आहेत. वास्तव न्युज लाईव्ह परिवार सुध्दा गायकवाड परिवाराच्या दु:खात सहभागी आहे.