मौलाना आझाद अल्पसंख्याक मिशन संस्थाद्वारे रोडसेफ्टी व अपघात रोखण्यासाठी मोफत रेडियम मोहीम- डॉ पठाण 

नांदेड-शहरात व जिल्ह्यात दरवर्षी प्रमाणे 2025 या वर्षीचा प्रत्येक वाहनांना मोफत रेडियम लावण्याचा विक्रम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ मोहम्मद आरिफखान पठाण यांनी आपले चौथे वर्ष साजरे केले आहेत .

मौलाना आझाद अल्पसंख्याक मिशन संस्थेचे मुख्य उद्दिष्टे आणि हेतू असा की देशात दररोज हजारोच्या संख्येने अपघात होतात त्याची कारने मिमांसा शोधली असता त्यातुन असे निर्दशनास आले की रस्त्यावरील अपघात हे ब्रेक लाईट किंवा पार्किंग लाईट अनेक वाहनांना आढळत नाही ज्यामुळे मागच्या वाहन धारकाला आपल्या पुढे वाहन आहे किंव्हा नाही हे स्पष्ट दिसत नसल्या कारणाने मागचे वाहन पुढच्या वाहनावर आदळल्या जाते त्यामूळे जिवीत व वित्त हानी होत असते त्यामूळे अनेकांचे संसार उघड्यावर पडलेली आहेत ती अपघात रोखण्यासाठी सर्वोत्तम पर्याय म्हणजे रेडियम असतो म्हणूनच आम्ही या क्षेत्राची निवड करून अपघात टाळणे संबंधी आवश्यक त्या सूचना आणि पर्याय वाहन धारका पर्यंत पोहचवितो ज्याचे आम्हाला समाधान प्राप्त होतो असे उदगार संस्थापक अध्यक्ष सचिव या नात्याने आम्ही या कार्यक्रमाचे आयोजन करीत असतो असे डॉ मोहम्मद आरिफखान पठाण यांनी सांगितले आहे

दरवर्षी आम्ही चारचाकी वाहने. अवजड ट्रक. ऑटोरिक्षा. ट्रॅक्टर ट्रॉली. यांना पुढे पांढरारंग. दोन्ही बाजूंनी पिवळा रंग. आणि मागच्या बाजूला लाल रंगाचा रेडियम असे जवळपास 800 ते 1000 फूट रेडियम मोफत लावल्या जातो ही खर्चिक बाब असुनही तो स्वखर्चातून लावण्याचा हा खरोखरच मोलाचे योगदान आहे असे नांदेड सहायक उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप निमसे साहेबांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत

 

या रस्ता सुरक्षा अभियान सप्ताह निमित वाहनांना रिफ्लेक्टर (रेडियम ) चिकट्विताना निमसे साहेब . मोटर वाहन निरीक्षक किशोर भोसले. सहायक मोटर वाहन निरीक्षक निलेश ठाकूर व सायली शंकर यांच्या हस्ते मोहिमची सुरूवात करण्यात आली आहे ती ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूल कौठा आणि फिटनेस चाचणी ट्रॅक वाघि येथे तसेच देगलूर नाका. कलामंदिर. तरोडा नाका. अर्धापूर. भोकर. चनदासीग कॉर्नर येथे ज्या वाहनांना रेडियम लावलेले नाहीत तश्या वाहनांना पुढून पाच फूट व दोन्ही बाजूंनी 1फूट व मागील बाजु पाच फूट असा त्या वाहनांना मोफत रेडियम लावण्याचा विक्रम या संस्थेने केलेला आहे त्या एनजीओला याचे श्रेय पारितोषिक आणि बाक्षिष स्वरूपातून आम्हाला मिळालेले आहेत तीच आमची पोचपावती आहे असे अनेक राज्यातून व महाराष्ट्रातून मिळालेले आहेत तर बॉलीवूड सिने अभिनेता. अभिनेत्री. यांच्या हस्ते उत्कृष्ठ पुरस्कार प्राप्त करणारे नांदेड जिल्ह्यातील एकमेव व्यक्ती ज्यांनी चार वर्षाच्या काळात एकोणतीस पुरस्कार घेनारी म्हणजे डॉ मोहम्मद आरिफ खान पठाण हे आहेत जे दैनिक नांदेड चौफेरचे संपादक पण आहेत ज्यांच्या निर्भीड लेखणीमुळे भल्या भल्यांची वाट लावलेली आहे जो नांदेड चौफेर वाचल्या शिवाय झोपच येत नाही असे लाखो वाचक प्रेमी आम्हाला मिळालेले आहेत ज्यामुळे आम्ही सदैव जनतेच्या सेवेसाठी तत्पर असतो. हीच पुण्याई आम्हाला शक्ती वरदान करते जो आई वडिलांची पुण्याई पण आहे

 

आमची संस्था 2005 पासून सेवेत कार्यरत आहे पण शासकीय लाभ आज पर्यंत घेतलेला नाही तोच धाडसिपना वृत्तमान क्षेत्रात पण तोच कणखर भूमिका घेतली आहे ज्याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो आहे . पुढील योजना आखली असुन गोरगरीब. भिक्षू लोकांना अन्नदान वाटप करण्याचा आमचा मानस आहे जर ईश्वराने साथ दिली तर ते दिवस पण दूर नाही .

सदरील रस्ता सुरक्षा सप्ताह अभियान अंतर्गत योगी लॉजिस्टिक्स भारत ट्रान्स्फोर्ट. सानिया मोटर्स. राज मोटर्स. हमीदभाई कन्सल्टिंग. दोस्ती ट्रान्सफोर्ट. आदींनी परिश्रम घेतले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!