किनवटमध्ये 21 लाख रुपये असलेले एटीएम मशीन चोरट्यांनी पळवले

नांदेड(प्रतिनिधी)-आज दि.22 जानेवारीचा सुर्योदय होताच किनवटमध्ये 21 लाख रुपये असलेली एसबीआय बॅंकेची एटीएम मशीन चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला.
आज सकाळी सुर्योदय होताच किनवट शहरातील गोकुंदा भागात असलेल्या एसबीआय बॅंकेच्या एटीएम सेंटरमध्ये मशीनच नसल्याचे दिसले. याबाबतची चर्चा बॅंकेचे अधिकारी आणि पोलीसांपर्यंत पोहचल्यानंतर धावपळ सुरू झाली. बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे या एटीएम मशीनमध्ये जवळपास 21 लाख रुपये रोख रक्कम होती. किनवट पोलीसांनी या संदर्भाने गुन्हा दाखल केला आहे. किनवटचे पोलीस निरिक्षक सुनिल बिर्ला यांनी वास्तव न्युज लाईव्हला सांगितले की, एटीएम मशीन चोरट्यांचा शोध घेण्यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न करू आणि त्यांना जेरबंद करू.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!