नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण येथील पोलीस उपनिरिक्षक विश्र्वदिप रोडे यांना निलंबित केल्याच्या आदेशावर तारखांमध्ये असलेला घोळ हा काही घोळ नसून शासकीय कागदपत्रांमध्ये असे अनेकदा घडत असते.
दि.10 जानेवारी 2025 रोजी पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांना भेटून माझ्या मुलीचा शोध घेण्यासाठी 50 हजार आणि 30 हजार असे 80 हजार रुपये पोलीस उपनिरिक्षक विश्र्वदिप रोडे यांचे सहाय्यक असलेल्या पोलीस अंमलदाराकडे दिले तरी पण त्यांनी तक्रारच नोंदवून घेतलेली नाही असा तो अर्ज होता. मुळात हा अर्ज 6 जानेवारी 2025 रोजी लिहिलेला आहे आणि तो हस्ताक्षरात लिहिलेला आहे. हा अर्ज सोबत घेवून अर्जदार 10 जानेवारी रोजी पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांना भेटले आणि त्यावर प्रष्ठांकन करत पी.एस.आय.रोडे यांना निलंबित करण्यात आले आहे. सोबत त्यांची प्राथमिक चौकशी इतवारा उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक करतील असे लिहिले आणि त्यावर स्वाक्षरी करून खाली 10 जानेवारी 2025 रोजी लिहिली आणि आपले पद सुध्दा लिहिले. हा अर्ज पोलीस उपमहानिरिक्षक नांदेड परिक्षेत्र कार्यालयात 13 जानेवारी रोजी आवक झाल्याचा शिक्का मारलेला आहे. त्यावर शाखेचे नाव सुध्दा लिहिलेले आहे. ती विभागीय चौकशी शाखा आहे म्हणून डी.ई. असे लिहिलेले आहे.
या अर्जाबाबत जाणकारांना चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, अनेकदा असे घडते की, अर्जदार हा थेट त्या कार्यालयातील प्रमुख साहेबांना भेटतो आणि प्रमुख साहेब त्यावर प्रष्ठांकन करतात आणि त्यानंतर तो अर्ज आवक होण्यासाठी जातो. आता 10 जानेवारी रोजी प्रष्ठाकंन झाले असेल आणि तो अर्ज 13 जानेवारी रोजी आवक झाला असेल याचा शोध होण्याची गरज आहे. किंवा तो अर्ज जाणून बुजून तिसऱ्या दिवशी आवक करायला लावला गेला काय? याचाही शोध होण्याची गरज आहे. नुसता अर्ज आवक झाला असता तर त्यावर शाखेचे नाव डी.ई.कसे लिहिले हा ही प्रश्न आहे. शहाजी उमाप यांनी या अर्जावर प्रष्ठांकन करतांना सुरूवातच डी.ई. या शब्दापासून केलेली आहे. म्हणूनच आवक करणाऱ्याने त्यावर डी.ई. शाखेचे नाव लिहिलेले आहे. नसता त्यावर काहीच लिहिलेले नसते असे जाणकार सांगतात. एकूणच या सर्व प्रकाराला कोणाचे पाठबळ आहे काय? आणि तेही शहाजी उमाप यांच्या संदर्भाने हे पाठबळ देण्याची हिम्मत कोणी दाखवली याचाही शोध होणे आवश्यक आहे. यापुर्वी नांदेड जिल्ह्यामध्ये मुुंबई येथून व्हाटसऍपवर पाठविलेल्या अर्जावर सुध्दा गुन्हा दाखल करण्याचे आदेश तत्कालीन अपर पोलीस अधिक्षकांनी दिले आहेत अशी नोंद याच नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात आहे.
संबंधीत बातमी….