नांदेड – अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य व मातोश्री भागाबाई विट्ठलराव डोंगरे प्रतिष्ठानचे कवी दीपक सपकाळे व शाहीर विठ्ठल जोंधळे स्मृतीपुरस्कार वितरण सोहळा व कविसंमेलन नुकतेच संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी येथील सुप्रसिध्द साहित्यिक देविदास फुलारी हे होते तर उद्घाटक म्हणून हिंगोली येथील कवयित्री सिंधुताई दहिफळे यांची उपस्थिती होती. जेष्ठ साहित्यिक दिगंबर कदम यांच्या शुभ हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. या सोहळयासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक मा. महेश मोरे व कवि कट्टा समुह संचालक अशोक कुबडे, मातोश्री भागाबाई विट्ठलराव डोंगरे प्रतिष्ठानचे सचिव ग्रामीण कवी नागोराव डोंगरे यांची उपस्थिती होती.
अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य व मातोश्री भागाबाई विट्ठलराव डोंगरे प्रतिष्ठानचे पुरस्कार वितरण शहरातील सहयोग नगर येथील माता रमाई आंबेडकर बुध्द विहार सभागृहात संपन्न झाले. येथील विद्रोही कवयित्री छाया बेले यांना स्मृतीशेष कवी दिपक सपकाळे साहित्य गौरव पुरस्काराने सन्नमानीत करण्यात आला व जेष्ठ शाहीर दिगू तुमवाड यांना स्मृतीशेष शाहीर विट्ठलराव डोंगरे पुरस्कार देवून गौरव करण्यात आला. हा पुरस्कार विरतरण सोहळा राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन दिप प्रज्वलीत करुन सुरु करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते दोन्ही पुरस्कार प्रदान करण्यात आले.
यानंतर घेण्यात आलेल्या कविसंमेलनात कवी प्रज्ञाधर ढवळे यांनी नित नव्या आभाळात उठणारे सूर्यवादळही तुझेच आहे ही रचना सादर करुन कविसंमेलनाचा आगाज केला. कविसंमेलनाचे अध्यक्ष कादंबरीकार मा. चंद्रकांत चव्हाण हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन सप्तरंगी साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष अनुरत्न वाघमारे हे होते आनेक कवी यांनी आपल्या रचना सादर केल्या श्रीनिवास मस्के, नागोराव डोंगरे, छाया बेले, विमलताई शेंडे, अशोक कुंबडे, नरेंद्र धोंगडे, थोरात बंधु, जयाताई सुर्यवंशी, आ.ग. ढवळे, सिंधुताई दहिफळे, राम तरटे, उषाताई ठाकुर, लोणे गुरूजी, सुनंदाताई कांबळे, गयाताई कोकरे, सुंनंदाताई भगत, धुळेताई, रेखाताई कोकरे, एन.सी. भंडारे, प्रज्ञाधर ढवळे, लताताई शिंदे, मांजरमकर सर, बिराडे सर, गणपत माखणे, मदन अंभोरे, गोणारकर ताई, प्रा.हिंगोले सर, शाहीर तुमवाड, मारोती मुंडे, सदानंद सपकाळे, यांनी आपल्या परिर्वतनवादी कविता सादर केल्या कविसंमेलनाचे सुत्रंसचालन कवयित्री बालिका बरगळ यांनी केले तर आभार कवयित्री उषाताई ठाकुर यांनी मानले.