नांदेड(प्रतिनिधी) -‘ नाटकाच्या यशस्वीतेत रंगभूषा आणि वेशभूषेची भूमिका खूप मोलाची असते. नटाचे भूमिकेतील आवश्यक रूप बदलणारे ते अभिन्न अंग असते ‘ असे प्रतिपादन ‘ प्राचार्य अमृतराव भद्रे आंबेडकरवादी नाट्य प्रशिक्षण शिबिरात आज मार्गदर्शन करताना सुप्रसिध्द अभिनेते आणि ‘ यशोधरा ‘ महानाट्याचे दिग्दर्शक सुनील ढवळे (परभणी ) ह्यांनी केले.
ह्या सत्राच्या अध्यक्षस्थानी मुख्य संयोजक डॉ.विलासराज भद्रे हे होते.प्रारंभी शिबिरार्थी आनंद कांबळे ह्यांनी मान्यवरांचे स्वागत केले.सूत्रसंचालन सिद्धार्थ कांबळे यांनी केले तर आभार कृष्णा गजभारे यांनी मानले.अनेक वर्षांनंतर महाराष्ट्रात १४ दिवस यशस्वीपणे चालणारे हे आंबेडकरवादी नाट्य शिबिर ठरले आहे त्याबद्दल उपस्थितांनी मुख्य संयोजक,समन्वय समितीचे अनेकांनी कौतुक केले.