नांदेड(प्रतिनिधी)-भाजपा प्रणित सेवा शक्ती संघर्ष राज्य परिवहन महामंडळाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी गंगाधर वाघमारे तर सचिव पदी राजू घागरदरे यांची निवड करण्यात आली.
भाजप प्रणित सेवा शक्ती संघर्ष एस.टी.कर्मचारी संघटनेची नवनिर्वाचित कार्यकारणी केंद्रीय पदाधिकारी असणाऱ्या श्रीमती पद्मश्री राजे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत केंद्रीय संघटक सचिव अशोक वजिरगावे हे निवडणुक निरिक्षक म्हणून काम बघीतले. यावेळी अध्यक्ष म्हणून गंगाधर वाघमारे, सचिव पदी राजू घागरदरे, कार्याध्यक्ष पदी गोविंद कुलकट्टे, संघटक सचिव शिवहर शिवपुजे यांची पदाधिकारी म्हणून निवड करण्यात आली. याचबरोबर आघार मिडीया प्रसिध्दी प्रमुख बबन गंगाधर भुरे यांची निवड करण्यात आली.
यावेळी विभागीय सचिव गोविंद फुले, राजश्री कल्याणकर, कलावती नरवाडे आणि विभागातील नामदेव राठोड, बियाणी, पांडे, पडलवार, पंढरीनाथ मुरकुटे, संदीप जेटी, आकाश राठोड, डी.आर.मोरे, नागनाथ इपर, नंदकिशोर मारमवार, बजरंग कारेगावकर, चंद्रकांत सिध्दापुरे, अच्युत पवळे, अशोक गुट्टे, आ.एस.केंद्र, एम.जी.स्वामी, एस.डी. हंबर्डे, यु.व्ही.नरवटे, एच.बी.वडेर, जी.बी.नागलवाड, बी.यु.बिडगर, विपीन बोरले, महेश सांगवीकर, गजानन आव्हाड, जी.बी.पवार, खंडोजी काळे, एल.बी.काळम, भोईरवार, माधव केंद्रे यांच्यासह आदींची यावेळी निवड करण्यात आली. सर्वांच्यावतीने पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले.