नांदेड(प्रतिनिधी)-विहिर खोदण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या स्फोटकांमुळे एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. लोहा पोलीसांनी चार जणांविरुध्द सदोषमनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
छायाबाई सुनिल एडके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 23 डिसेंबरच्या सकाळी 6.30 वाजता मौजे खडकमांजरी शिवारात विहिर खोदण्याचे काम सुरू होते. विहिर खोदतांना स्फोटके वापरली जातात. स्फोटके वापरतांना घेण्याच्या काळजीमध्ये कुठे तरी चुक झाली आणि त्यांचे पती सुनिल नरोजी एडके यांचा स्फोटकांच्या स्फोटात त्यांचा मृत्यू झाला. लोहा पोलीसांनी गुरमितसिंघ गोविंदसिंघ दरोगा, सुशिलकुमार विश्र्वनाथ ढवळे रा.डोंगरगाव, शाहरुख युसूफ रजा, शेख शादुल दोघे रा.कुरळा यांच्याविरुध्द भारतीय न्याय संहितेतील कलम 105, 288, 3(5) सह स्फोटक पदार्थ आणि द्रव्य अधिनियम 1984 च्या कलम 9 (ब)(1)(ब), 9 (3)(क)(2) प्रमाणे तसेच स्फोटक पदार्थ अधिनियम 1908 मधील कलम 3 आणि 4 नुसार गुन्हा क्रमांक 431/2024 दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरिक्षक केदार अधिक तपास करीत आहेत.