नवी दिल्ली-डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर 15 जनपथ नवी दिल्ली येथे बॉलीवूड सिझन -2 /2024 सिने कलाकारांचा कार्यक्रम आयोजित होता.या कार्यक्रमात नांदेडचे भूमिपुत्र व दैनिक नांदेड चौफेरचे संपादक तथा नीती आयोगाचे सदस्य डॉ मोहम्मद आरिफखान पठाण यांची निवड करण्यात आल्याचे पत्र सिने अभिनेत्री मिनाक्षी शेषाद्री यांच्या स्वाक्षरीने 12 डिसेंबर रोजी नांदेडला प्राप्त झाले होते. या कार्यक्रमाला आवर्जून परीवारासहित पठाण यांनी उपस्थिती दर्शविलेली आहे .
या बॉलीवूड सिझन -2 कार्यक्रमात अनेक सिने अभिनेता. अभिनेत्री यांची हजेरी होती तर अनेक वीआयपी मान्यवर नेते आणि सह कलाकार यांच्या साक्षीने हा सोहळा पार पडला आहे यात उत्कृष्ठ कामगिरी. सेवा. चांगले उपक्रम राबविले.जनसामान्यांना लेखणीतून सत्याची बाजु निर्भिडपणे मांडणाऱ्या आणी जनतेसाठी दिलेला योगदान. पत्रकारितेची दूरदृष्टी . एनजीओच्या माध्यमातुन घेतलेला पुढाकार याचा लेखाजोखा घेतलेल्यांची निवड करण्यात येते या माध्यमातून मौलाना आझाद अल्पसंख्याक मिशन नांदेड भारत सरकार अंतर्गत नीती आयोगाचे सदस्य डॉ.मोहम्मद आरिफखान पठाण यांना हा महत्वाचा पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे जो सर्वांच्या साक्षीने बॉलीवूड सिझन -2 उत्कृष्ठ पुरस्कार सिने अभिनेत्री मिनाक्षी शेषाद्री यांच्या हस्ते आज 21 डिसेंबर रोजी डॉ मोहम्मद आरिफखान पठाण यांना मिळालेला आहे हा नांदेडसाठी अभिमानास्पद बाब आहे. असे गौरवोद्गगार करीत मिनाक्षी शेषाद्री यांनी पठाण यांचे भर भरून कौतुक केलेले आहे
महत्वाची बाब म्हणजे मीनाक्षी शेषाद्री यांनी नांदेड येथील गुरुद्वारा व रेणुका माता मंदीर दर्शनासाठी येणार असल्याचे सूतोवाच केले असुन आम्हाला आमच्या एन जी ओ मार्फत कार्यक्रम हाती घ्या मी निश्चित येणार आहे असे आश्वासन पठाण यांना दिलेले आहेत या सिझन -2 मध्ये 45 लोकांना मीनाक्षी शेषाद्री यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे ज्यामध्ये देशातील प्रत्येक राज्यातून योग्य व्यक्तीची निवड करण्यात आली होती
डॉ मोहम्मद आरिफखान पठाण हे आतापर्यंत 29 पुरस्काराचे मानकरी ठरले असुन त्यांना 25 फेब्रुवारी रोजी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नवीदिल्ली येथे पुरस्कार देणार असल्याचे घोषीत करून तशी निवड याच कार्यक्रमात करण्यात आले आहे. त्या दरम्यान कार्यक्रमा स्थळीच पठाण यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत होता ज्यामुळे मी भारावून गेलो होतो आणि माझ्या परिवारात आनंदाचे क्षण पाहावयास मिळत होते तेव्हा माझ्या लक्षात आले की मी माझ्या आयुष्यात पैसा व्यतिरिक्त खुपकाही कमविले आहे जे आई वडिलांचे आशीर्वादामुळे इथपर्यंत पोहचलो आहे . त्यात परिवाराचा मोठा योगदान आहे आणि मित्रांची साथ व पत्रकार. माझे प्रतिनीधी. सहकारी यांच्या सहकार्यामुळेच मी इथपर्यंत पोहचलो हे माझे भाग्यच समजतो असे डॉ मोहम्मद आरिफखान पठाण यांनी आपले मनोगत व्यासपीठावर व्यक्त केलेले आहेत. आणि मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आहे असे दिल्ली येथील पत्रकारांना संभोदित केले आहे.