नांदेड(प्रतिनिधीण)-परभणीच्या घटनेनंतर नांदेडच्या जनतेने अत्यंत शांततेत त्या घटनेसंदर्भाचे आंदोलन करत प्रशासनाला सहकार्य केल्याबद्दल नांदेडचे पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी नांदेडकरांचे धन्यवाद व्यक्त केले आहे.
10 डिसेंबर रोजी परभणी शहरात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधान प्रतिकृतीची विटंबना झाली. या नंतर नांदेड शहरात, तालुक्यात आणि अनेक गावांमध्ये 15 ठिकाणी जनतेने 12, 13 आणि 14 डिसेंबर रोजी रॅली, मोर्चे काढून या घटनेचा निषेध व्यक्त केला आणि जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांना निवेदने दिली. निर्दशनांच्यावेळी काही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून 20 स्ट्राईकींग, 5 आरसीपी आणि 1 एसआरपीएफ कंपनी यांनी मेहनत घेतली. सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, नंादेड जिल्ह्यातील 36 पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, पोलीस अंमलदार, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार आणि पोलीस अधिक्षक कार्यालयातील विविध शाखेतील अधिकारी आणि पोलीस अंमलदार असा बंदोबस्त नेमण्यात आला होता. नांदेडच्या जनतेने केलेल्या सहाय्यामुळे कोणताही अनुचित प्रकार या दरम्यान घडला नाही. त्यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी नांदेडकर जनतेचे धन्यवाद व्यक्त केले आहे.