परभणी (प्रतिनिधी)-परभणी येथे पोलीस विभागाने रात्रीच्यावेळी आणि दिवसा सुध्दा अनुसूचित जातीच्या वस्त्यांमध्ये मोठ्या संख्येत प्रवेश करून तेथील वाहनांची नासधुस केल्याचा प्रकार घडला आहे. त्यासाठी महाराष्ट्र प्रदेश कॉंगे्रस अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिध्दार्थ हत्तीअंबीरे यांनी कार्यवाहीची मागणी केली आहे.
परभणी येथे महामानव डॉ.बाबासाहे आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केल्यानंतर त्याची प्रतिक्रिया पण घडली. प्रतिक्रिया घडल्यानंतर पोलीसांनी बळाचा वापर केला. त्यासाठ ी सुध्दा प्रतिक्रिया तिव्र झाली. यात काही ठिकाणी जाळपोळ, काळी ठिकाणी वाहनांची तोडफोड करण्यात आली. त्यानंतर पोलीसांनी मोठ्या संख्येत अनुसूचित जातींच्या वस्त्यांमध्ये प्रवेश केला. जनतेला अत्यंत जोरजोरात बोलत दार बंद कर, घरात जा असे शब्द वापरले. त्या ठिकाणी असलेल्या ऍटोला एका पोलीसाने ऍटोच्या मागे असलेल्या काचेवर आपल्या हातातील काठी मारून फोडून टाकले. त्यानंतर त्याच ठिकाणी पाठीमागे येणाऱ्या पोलीसांपैकी एकाने ऍटो मागे उभ्या असलेल्या दुचाकी गाड्यांच्या प्रकाशझोताचे काच, इंडीकेटर तोडून टाकले. या संदर्भाने सिध्दार्थ हत्तीअंबीरे सांगत होते की, घडलेला हा प्रकार अत्यंत दुर्देवी आहे. तो आमच्यावर अन्याय आहे आणि या अन्यायाविरुध्द आम्ही वेगळा लढा देवू.
सोर्स-एबीपी वृत्तवाहिनीची बातमी…
खाजगी इसमांचा लाठीचार्ज
परभणीत पोलीसांनी बळाचा वापर केला तेंव्हा अनुसूचित जातीचे युवक पळत असतांना एका गल्ली थांबलेल्या खाजगी इसमाने सुध्दा आपल्या हातात लाकूड घेवून त्या पळत आलेल्या युवकाला एवढ्या जोरात ते लाकूड मारले की, ते लाकूड तुटून गेले. खरे तर पोलीसांनी तसे करणाऱ्या त्या खाजगी युवकाला ताब्यात घ्यायला हवे होते आणि त्याच्यावर योग्य कायदेशीर कार्यवाही करायला हवी होती. परंतू ते घडले नाही. उलट पोलीसाने आपल्या हातातील काठी उगारुन त्याला बाजूला केले. अशा पध्दतीने परभणी येथे सुरू असलेला पोलीस अत्याचार व्हिडीओंच्या माध्यमाने प्रसारीत होत आहे.