नांदेड(प्रतिनिधी)-इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक 29 वर्षीय महिला आपल्या सोबत स्वत:चा 7 वर्षाचा मुलगा घेवून घरातून निघून गेली आहे. पोलीस विभागाने या दोघांच्या शोधासाठी शोधपत्रिका जारी केली आहे.
भगतसिंघ रोडवर राहणाऱ्या उषाबाई कोंडीबा रुपनर यांनी दिलेल्या खबरीनुसार त्यांची मुलगी मिना कृष्णा आवळे (29) ही दि.5 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 10.30 वाजात आपल्या खाजगी कामावर जात आहे असे म्हणून घरातून निघून गेली. सोबत तिने आपला मुलगा मोहित कृष्णा आवळे (7) वर्ष याला सुध्दा नेले आहे. यानंतर ती घरी आली नाही आणि आम्ही तिचा शोध घेवून ती मिळून न आल्याने मिसिंग तक्रा्रर 7 डिसेंबर रोजी देत आहोत. इतवारा पोलीसांनी या प्रकरणी मिसिंग क्रमांक 68/2024 दाखल केला आहे. तसेच या प्रकरणाचा तपास पोलीस अंमलदार मजाज अहमद खान यांच्याकडे देण्यात आला आहे.
पोलीसांनी जारी केलेल्या शोध पत्रिकेनुसार हरवलेली महिला मिना आवळे तिचा रंग सावळा आहे. उंची 5 फुट 2 इंच आहे. बांधा मजबुत आहे. पोशाख हिरवी चुनरी आणि सहावारी साडी परिधान केलेली आहे. मिना आवळेंना हिंदी आणि मराठी भाषा बोलता येते. त्यांनी सोबत नेलेला मुलगा मोहित कृष्णा आवळे याची उंची 3 फुट आहे. बांधा मध्यम आहे. त्याने पांढऱ्या रंगाचा ओमकार इंग्लीश स्कुल जुना कौठा येथील गणवेश परिधान केलेला आहे. त्याला सुध्दा हिंदी व मराठी भाषा बोलता येते.
इतवारा पोलीसांनी जनतेला आवाहन केले आहे की, हरवलेली महिला व बालक कोणास दिसल्यास जनतेने याबाबतची माहिती इतवारा पोलीसांना द्यावी. इतवारा पोलीस ठाण्याच्या दुरध्वनी क्रमांक 02462-236510 आणि तपासीक अंमलदार मजाज अहेमद खान यांचा मोबाईल क्रमंाक 9923400081 यावर सुध्दा माहिती देता येईल.