नांदेड(प्रतिनिधी)-पूरग्रस्तांचे थकीत अनुदान बोगस पुरग्रस्तांना दिल्याप्रकरणी नांदेड जिल्हा मजुर युनियन(सीटू) च्यावतीने साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.
आज महानगरपालिकेसमोर सिटूच्यावतीने करण्यात आलेल्या उपोषणानुसार पुरग्रस्तांचे थकीत अनूदान आणि नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या गलथान कारभाराविरोधात साखळी उपोषण सुरू आहे. सिटूने दिलेल्या निवेदनाप्रमाणे बोगस पुरग्रस्तांची अनुदान देण्याची तयारी केली आहे. तसेच खऱ्या पुरग्रस्तांना डावलण्यात आले आहे. महानगरपालिका झोन क्रमांक 4 चे क्षेत्रीय अधिकारी संजय जाधव यांच्या विरोधात अनेक तक्रारी असतांना त्यांना पदोन्नती दिली आहे. ती पदोन्नती रद्द करा, तसेच बिल कलेक्टर शेख खदीर आणि इतर कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करा तसेच तहसील नांदेड कार्यालयातील पेशकार जाधव आणि ऑपरेटर यांच्या दुर्लक्षपणामुळे सामान्य नागरीकांना खुप हाल होत आहेत. अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. या निवेदनावर कॉ.गंगाधर गायकवाड आणि कॉ.उज्वला पडलवार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.